शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांसाठी आता पुढचा नंबर कुणाचा ? प्रशासन, राजकीय वर्तुळात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 23:00 IST

अजित पवार यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर पुण्यातील सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी रांगेत अजितदादा यांना आपल्या स्टाईलनुसार काम करणारे अधिकारी हवे असतात. पहिल्या टप्प्यातील बदल्यानंतर आता पुढील बदल्या कुणाच्या याच्या जोरदार चर्चा

पुणे : राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरु झाली होती. या चर्चेनुसार गेल्या आठ दिवसांत पुण्यासह राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या. यामध्ये पहिल्याच टप्प्यात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, पुणे महापालिका आयुक्त यांचा नंबर लागला. यामुळे बदल्यासाठी आता पुढचा नंबर कुणाचा याची चर्चा प्रशासन आणि राजकीय वर्तुळात सुरु आहे. यामध्ये विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी याचा नंबर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.    पुण्याचे पालकमंत्री पद अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आले. अजित पवार यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर पुण्यातील सर्वच विभागांच्या अधिका-यांचे धाबे दणाणले. अजितदादांनी आपल्या स्टाईलनुसार आठ दिवसापूर्वी सकाळी नऊ ते सायंकाळी सात, साडेसात पर्यंत जिल्हा नियोजनसह अनेक विभागाच्या मॅरेथॉन बैठका घेऊन आपल्या कामाचा झपाटा दाखवून दिला. याच मॅरेथॉन बैठकीत अधिकाऱ्यांच्या कामाचा उरक देखील त्यांच्या लक्षात आला. याचा पहिला मोठा झटका पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी उदय जाधव यांना बसला. याच बैठकीमध्ये तिर्थक्षेत्र विकास आराखड्यावरून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना देखील आराखड्याची कामे वेळेत व दर्जेदार करण्यासाठी स्वत: लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. पुणे जिल्ह्यांमध्ये बहुतेक सर्व महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अजित पवार यांचे विशेष लक्ष असते. अजितदादा यांना आपल्या स्टाईलनुसार काम करणारे अधिकारी हवे असतात. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या त्यांनी बदल्या देखील केल्या आहेत.    पहिल्या टप्प्यातील बदल्यानंतर आता पुढील बदल्या कुणाच्या याच्या जोरदार चर्चा प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहेत. यामध्ये विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या देखील नावाची चर्चा आहे. परंतु म्हैसेकर येत्या जुलै महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. यामुळे त्याची बद्दली होणार की सहा महिन्ये संधी देणार हा महत्वाचा विषय आहे. परंतु यापूर्वी तत्कालीन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विकास देशमुख यांच्या देखील सेवानिवृत्ती जवळ असताना बदल्या झाल्या आहेत. यामुळे म्हैसेकर यांच्या बदलीकडे देखील प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष  लागले आहे. याशिवाय संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासकीय चेहरा म्हणून पाहिले जाणारे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्या नावाची देखील बदलीसाठी चर्चा सुरु आहे. दरम्यान नव्याने नुकतेच एखाद्या पदावर बदलून आलेल्या अधिका-यांच्या कामाचा उरक अजित दादांना न पडल्यास संबंधित अधिका-यांची देखील उचलबागडी होऊ शकते. यामुळे सध्या सर्वच विभागातील अधिका-यांमध्ये बदलीची धास्ती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारGovernmentसरकारTransferबदली