शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Diwali Vacation: आता गावी कसं जायचं! रेल्वे बुकिंग फुल्ल; विमानांची संख्याही वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 09:53 IST

दिवाळी विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी

पुणे : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे लोकांनी सुट्यांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ९८ टक्के रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे आता गावी कसे जायचे? हा प्रश्न लोकांना पडला आहे. याउलट कोरोनानंतर रविवारी पहिल्यांदाच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १७२ प्रवासीविमानांची ये-जा झाली, त्याद्वारे २५ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद केली आहे. ही संख्या दिवाळीच्या सुट्यांमुळे आणखी वाढणार असल्याने विमानाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विमानाचा प्रवास आजही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने त्यांचे प्रथम प्राधान्य रेल्वेलाच असते. पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या रेल्वेंपैकी ९८ टक्के रेल्वे फुल्ल झाल्याने परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अजूनपर्यंत रेल्वे बोर्डाकडून दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

का वाढते प्रवासी संख्या?

- राज्याच्या विविध भागातील नागरिक कामानिमित्त मोठ्या संख्येने पुणे जिल्ह्यात आले आहेत. येथे मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाल्याने ही संख्या वाढत गेली.- पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणूनदेखील ओळखले जाते, त्यामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. दिवाळीत विद्यार्थ्यांना १५ ते २० दिवस सुटी असते. त्यामुळे बहुतांश पालक दिवाळीनिमित्त गावी जातात किंवा फिरायला जाण्याचे नियोजन करतात. परिणामी पुण्यातून सुटीच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.- मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव, छटपूजा आणि उन्हाळी सुटी विशेष रेल्वे चालवल्या जातात. याच प्रकारे दिवाळी विशेष रेल्वे कधी सुरू करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.- पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ केली असून, दिवसाला १५ ते १७ हजार प्रवासी विमानाने ये-जा करतात. इतर ठिकाणच्या विमानांच्या संख्येत देखील वाढ होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021railwayरेल्वेairplaneविमानSocialसामाजिकpassengerप्रवासी