पुणे : कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीतील ९ गुन्हेगारांवर गुन्हे शाखेने ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. गोळीबाराचा कट गणेश विसर्जनाच्या दिवशी रचल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मयूर ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय २९, रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), मयंक मॉन्टी विजय व्यास (२९, रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), गणेश सतीश राऊत (३२, रा. गावडे चाळ, संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड), दिनेश राम फाटक (२८, रा. माथवड चाळ, संत ज्ञानेश्वर कॉलनी, आशिष गार्डन, कोथरूड), आनंद अनिल चांदलेकर (२४, रा. श्रीराम कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), मुसाब ईलाही शेख (३३, रा. सिद्धिविनायक कॉलनी,
कोथरूड), जयेश कृष्णा वाघ (३६, रा. केळेवाडी, कोथरूड), अक्षय दिलीप गोगावले (२९, रा. बाराटे चाळ, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), अजय महादेव सरोदे (३२, रा. योगिराज बिल्डिंग, वृंदावन कॉलनी, आझादनगर, कोथरूड) अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोथरूडमध्ये आपल्या टोळीची दहशत कमी झाली आहे. हे टोळीचे वर्चस्व आपल्याला वाढवायचे आहे. हमराज चौक, शास्त्रीनगर भागात काही दिवसांत जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवितो आणि केस लागली तर बाहेर काढतो, असे सांगून नीलेश घायवळ याने गणेशोत्सव विसर्जना दिवशी ६ सप्टेंबर २०२५ रोजी कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातूनच पुढे १७ सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुठेश्वर मित्रमंडळ चौकाजवळ गप्पा मारत उभे असलेल्यांवर घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात मोक्का कारवाई केली आहे.
हा गुन्हा घडल्यानंतर काही दिवसांत नीलेश घायवळ हा परदेशात पळून गेला. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली आहे. त्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे. आरोपींनी हा गुन्हा स्वत:चे व टोळीच्या आर्थिक फायद्याकरिता संघटितपणे केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले १ पिस्टल, १ रिकामी पुंगळी, नीलेश घायवळ याच्या घरझडतीमध्ये २ जिवंत काडतुसे, ४ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यात ९ जणांना अटक करण्यात आली असून, ८ जण अजून फरार आहेत. त्यांना न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आले आहे.
कोथरूड भागात बेकायदेशीर इमारती
नीलेश घायवळ व सचिन घायवळ यांनी कोथरूड भागात दोन बेकायदेशीर इमारती बांधल्या असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी पुणे महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या गुन्ह्यात १२२ साक्षीदार तपासले आहेत. तसेच ६ साक्षीदारांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत.
Web Summary : Notorious gangster Nilesh Ghaywal plotted a shooting during Ganesh Visarjan, promising weapons and money to his gang. Police filed charges against nine members after a shooting near Mutheshwar Chowk. Ghaywal, now abroad, faces an Interpol Red Corner Notice.
Web Summary : कुख्यात गैंगस्टर नीलेश घायवळ ने गणेश विसर्जन के दौरान गोलीबारी की साजिश रची, अपने गिरोह को हथियार और पैसे का वादा किया। मुठेश्वर चौक के पास गोलीबारी के बाद पुलिस ने नौ सदस्यों के खिलाफ आरोप पत्र दायर किया। घायवळ, जो अब विदेश में है, इंटरपोल रेड कॉर्नर नोटिस का सामना कर रहा है।