शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आता स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी करावी लागते प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 10:56 IST

येरवड्यातील अमरधाम येथील चिंताजनक परिस्थिती

ठळक मुद्देशहराबरोबरच उपनगरतही कोरोनामुळे वाढले मृत्यूचे प्रमाण

विशाल दरगुडे

कोरोनामुळे उपनगरात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. येरवड्यात अमरधाममध्ये विद्युतदाहीनीवर एकावेळी दोन अंत्यविधी व लाकडावर सात अंत्यविधी करू शकतात. परंतु याठिकाणी दररोज अंत्यसंस्कारासाठी पार्थिव घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. साहजिकच येरवड्यातील अमरधाम स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. 

गेल्या दहा दिवसापासून वडगावशेरी, खराडी, चंदननगर, विमाननगर भागात कोरोनाची रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. त्याप्रमाणे मृत्यूही मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने आता मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधी करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. सामान्यता कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर संसर्ग टाळण्यासाठी विद्युत किंवा गॅस, डिझेल शवदाहीनीत अंत्यसंस्कार करण्याचे शासनाचा आदेश आहे. त्यातच संसर्ग टाळण्यासाठी नातेवाईक आता मृत झालेल्याला रुग्णालयातून थेट अमरधाममध्ये नेत असल्याने या ठिकाणी वेटिंगला सामोरे जावे लागत आहे. मात्र गेल्या दहा दिवसापासून दररोज सरासरी पंधरा ते वीस अंत्यविधी होत असल्याने स्मशानभूमीवर मोठा ताण येत आहे. विद्युत दाहीनीमध्ये एक मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी किमान दोन तास लागतात. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरातून या ठिकाणी येरवड्यात अत्यंसंस्कार करण्यासाठी येत आहेत.त्यामुळे येथेही ताण अधिक आहे. मुंढवा येथील स्मशानभुमीतही नातेवाईकांना मृतदेह अत्यंविधीसाठी वेटींगरच राहवे लागत आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी निम्म्याहून अधिक रुग्णांचा अंत्यविधी अमरधाममध्ये

पुणे शहरात दररोज चाळीस ते पन्नास रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यापैकी जवळपास निम्म्याहून अधिक रुग्णांचा अंत्यविधी हा येरवडा अमरधाम मध्ये विद्युत दाहिनी वर केला जात असल्याने या ठिकाणी अधिक ताण आहे.  

अंत्यविधी करणारा कर्मचारी करतोय जीवावर उदार होऊन काम

येरवड्यातील अमरधाममध्ये अंत्यविधी करताना कर्मचाऱ्यांनी पीपीई किट,मास्क,सॉनिटायझर यासारख्या सुविधा देणे गरजेचे आहे. मात्र अंत्यविधी करण्यासाठी येथील कर्मचारी केवळ मास्क लावून काम करत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याYerwadaयेरवडाDeathमृत्यू