आता विकासकामेही ‘अ‍ॅप'वर :  पुणे महापालिकेचे नगरसेवक होणार स्मार्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 07:54 PM2019-01-22T19:54:15+5:302019-01-22T19:54:46+5:30

पुणे : प्रभागातील विकास कामांचा पाठपुरवठा करणे नगरसेवकांसाठी मोठी डोकेदुखी असते. यावर उपाय म्हणूनच प्रभागातील विकास कामांचा पाठपुरावा कारणे, ...

Now on development 'app': Pune Municipal corporator will be smart | आता विकासकामेही ‘अ‍ॅप'वर :  पुणे महापालिकेचे नगरसेवक होणार स्मार्ट 

आता विकासकामेही ‘अ‍ॅप'वर :  पुणे महापालिकेचे नगरसेवक होणार स्मार्ट 

Next

पुणे : प्रभागातील विकास कामांचा पाठपुरवठा करणे नगरसेवकांसाठी मोठी डोकेदुखी असते. यावर उपाय म्हणूनच प्रभागातील विकास कामांचा पाठपुरावा कारणे, प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळविण्यात याच वाया जाणारा वेळ वाचविण्यासाठीनगरसेवकांसाठी महापालिका स्वतंत्र ‘अ‍ॅप’ विकसित करणार आहे. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली, अशी माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली. 

                 नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकास कामे करून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करुन सादर करावे लागतात. या प्रस्तावांच्या फाईल्स क्षेत्रीय कार्यालय, मुख्य खात्यांकडील कामांसाठी संबंधित खात्याकडे फाईल पाठवून त्यास मंजुरी घ्यावी लागते. याचा पाठपुरावा करताना नगरसेवकांचा वेळ वाया जातो. सुचविलेल्या कामांची मंजुरी, त्यावर झालेली कार्यवाही याबाबत माहिती घेण्यासाठी नगरसेविकांना अधिका-यांकडे हेलपाटे मारावे लागतात. यामध्ये अनेक वेळा योग्य माहिती दिली जात नाही, विचारणा करूनही अर्धवट माहिती दिली जाते. 

             वेळेचा हा अपव्यय टाळावा, कामे त्वरित मार्गी लागावी यासाठी महापालिकेने हे ‘अ‍ॅप’ विकसित करावे असे यात नमूद केले होते. या अ‍ॅपमध्ये कामाचे स्वरूप निविदा प्रक्रिया, ईस्टिमेट, विविध प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र आदिंची माहिती असावी. नगरसेवक आणि अधिकारी यांना हे अ‍ॅप मोबाइल मध्ये डाऊनलोड करता येईल. यामुळे कामाच्या फाईलची स्थिति नेमकी काय हे समजेल असे प्रस्तावात नमूद केले.

Web Title: Now on development 'app': Pune Municipal corporator will be smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.