शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकर नरमले ; हेल्मेटबाबतीत हाेतीये जागृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 19:08 IST

हेल्मेटबाबत नागरिकांमध्ये आता जागृती हाेत असून हेल्मेट घालणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.

पुणे : आशिया खंडातील सर्वाधिक दुचाकी असणाऱ्या पुणे शहरात हेल्मेट सक्तीचे प्रयाेग याआधी अनेकदा करण्यात आले. परंतु प्रत्येकवेळी पुणेकरांनी या सक्तीला कडाडून विराेध केला. नवीन आयुक्त येताच त्यांनी नवीन वर्षापासून शहरात हेल्मेट सक्ती करणार असल्याचे जाहीर केले. नेहमीप्रमाणे यंदाही या सक्तीला विराेध झाला खरा, परंतु पाेलिसांनी आपली कारवाई चालूच ठेवली. एकीकडे पाेलीसांनी कारवाई सुरु ठेवली असताना दुसरीकडे नागरिकांचे समुपदेशन सुद्धा केले. याचा सकारात्मक परिणाम सध्या पाहायला मिळत आहे. एक जानेवारीपासून हेल्मेट सक्ती केल्यानंतर अवघ्या पाचच दिवसात नागरिकांमध्ये जागृती हाेत असताना दिसत असून हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे. 

पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असली तरी हेल्मेटला नेहमीच विराेध हाेत आला आहे. शहरात दुचाकीचा वेग अधिक नसताे, तसेच जवळच्या अंतरावर जाण्यासाठी हेल्मेटची गरज नाही. अशी अनेक कारणे नेहमीच दिली जातात. त्यातच हेल्मेटमुळे मान दुखते, केस गळतात असेही सांगितले जाते. हेल्मेट सक्तीला विराेध करण्यासाठी हेल्मेट सक्ती विराेधी कृती समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. परंतु हेल्मेट न घातल्यामुळे प्राण जाणाऱ्यांचे प्रमाण शहरात अधिक असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती गरजेची असल्याचे सांगत हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी जाहीर केले. त्याप्रमाणे कारवाई देखील करण्यात येत आहे. कारवाई करण्यात आलेल्या अनेक नागरिकांचे समुपदेशन देखील पाेलिसांकडून करण्यात आले. त्यामुळे याचा सकारात्मक परिणाम आता नागरिकांवर हाेताना दिसत असून सध्या हेल्मेट घालणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. 

शहरातील हेल्मेट्सच्या दुकानात नागरिकांची आता गर्दी हाेत आहे. विविध प्रकारचे हेल्मेट बाजारात असल्याने नागरिकांना पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यातही कमी वजनाचे हेल्मेट देखील बाजारात उपलब्ध असल्याने नागरिकांच्या ते साेयीचे हाेत आहे. सध्या शहरात प्रत्येक दाेन दुचाकी चालकांच्यामागे एकजण हेल्मेट घालत असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीAccidentअपघात