Pimpri Chinchwad: आता एक दिवस हॉर्नपासून सुटका, उद्योगनगरीत दर सोमवारी 'नो हॉर्न डे'

By विश्वास मोरे | Published: November 3, 2023 06:44 PM2023-11-03T18:44:29+5:302023-11-03T18:45:38+5:30

जनजागृतीकडे वाहन चालकांचे दुर्लक्ष...

Now a day free from horns, every Monday is No Horn Day in Udyog Nagar | Pimpri Chinchwad: आता एक दिवस हॉर्नपासून सुटका, उद्योगनगरीत दर सोमवारी 'नो हॉर्न डे'

Pimpri Chinchwad: आता एक दिवस हॉर्नपासून सुटका, उद्योगनगरीत दर सोमवारी 'नो हॉर्न डे'

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आता मोठ्याप्रमाणांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची भर पडत आहे. लाखो वाहनांच्या हॉर्नमुळे एक दिवस तरी सुटका होण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी शक्कल लढविली आहे. प्रत्येक आठवड्यातील पहील्या सोमवारी नो हॉर्न डे उपक्रम साजरा करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी कोणत्याही वाहन चालकाने हॉर्न वाजवू नये यासाठी वाहतूक पोलिस शाळा, कॉलेज, आय टी इंडस्ट्री, एम आय डी सी मध्ये जाऊन नो हॉर्न डे संदर्भात जनजागृती करणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहराचा विकास जोरात सुरु आहे. धावपळीवाच्या जीवनात कामावर जाण्याची, पुन्हा घरी येण्याची घाई असते. मात्र, वाहतूककोंडीमुळे कोणालाही या गोष्टी वेळेत करता येत नाही. वाहतूक कोंडीत अडकल्यावर प्रत्येक वाहन चालक वाहनाला जागा मिळावी, म्हणून हॉर्न वाजवितो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होते. ध्वनी प्रदूषणाचा त्रास वाहन चालकासह रस्त्यावर तसेच आसपास असणाऱ्या सर्वच नागरिकांना सहन करावा लागतो. या ध्वनी प्रदूषणामुळे अनेकांना कान तसेच मानसिक विकार झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

जनजागृतीकडे वाहन चालकांचे दुर्लक्ष- 

प्रादेशिक परिवहन कार्यालय, सामाजिक संस्था तसेच वाहतूक संस्थांकडून वारंवार जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, वाहन चालक याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होणाऱ्या अनेक ठिकाणी सातत्याने ध्वनी प्रदुषण होताना दिसते.

लोकमतने घेतला होता पुढाकार

२०१० मध्ये वाशी मध्ये रस्ता सुरक्षा अभियानामध्ये ध्वनी प्रदूषणाची मुद्दा समोर आला. या अभियानात सहभागी झालेल्या विनायक जोशी नावाच्या व्यक्तीने चार वर्षे हॉर्न वाजविला नसल्याचे समोर आले. तेंव्हा नो हॉर्न उपक्रम राबविण्याचे विचार समोर आला. लोकमतने घेतला होता पुढाकार घेत नो हॉर्न प्लिल्ज हे अभियान राबविले होते.

वाहतूक पोलिस जनजागृती

प्राथमिक स्वरूपात दर सोमवारी वाहन चालकांनी नो हॉर्न डे पाळावा, असा निर्णय शहर वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी वाहतूक पोलिस प्रत्येक शाळा, महाविद्यालये, आय टी इंडस्ट्री आणि एम आय डी सी मध्ये जाऊन जनजागृती करणार आहे. निष्कारण हॉर्न वाजणे किती धोकादायक आहे, ध्वनी प्रदुषण वाढल्याने काय परिणाम होतात याबाबत वाहतूक पोलिस जनजागृती करणार आहेत.

काय आहेत तोटे-

-  रस्त्यावर होणारे वाद
- अपघातांची वाढती संख्या
- रस्त्यावर वाढणारा गोंगाट
- गोंधळ वाढतो,
- नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम

वाहनांची संख्या...
एकूण वाहने - सुमारे २५ लाख
रस्त्यावर असणारी वाहने - सुमारे १५ लाख

घरातून बाहेर पडल्यानंतर इच्छित स्थळी जाईपर्यंत वाहन चालक प्रत्येक किलोमीटरला किमान ५ वेळा हॉर्न वाजवतो. यामुळे शहरातील वायू प्रदूषणात खूप वाढ होत असून, वाहन चालकांचे मानसिक स्वास्थ्य देखील खराब होत असते. यामुळे वाहन चालकांना विनंती असून, आपण एक दिवस अजिबात हॉर्न वाजविला नाही तर हळू हळू हॉर्न वाजविण्याची सवय कमी होत जाईल असा विश्वास वाटतो.

 - बाप्पू बांगर, पोलिस उपायुक्त वाहतूक विभाग

 

हॉर्नच्या गोंगाटमुळे गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, हृदय रोग असणाऱ्या सर्वच नागरिकांना त्रास होतो. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढणाऱ्या वाहनाची संख्या पाहता दररोज कमीत कमी एक कोटी वेळा हॉर्न वाजविला जातो. याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे पुण्यात १२ सप्टेंबर २०१८ रोजी पुण्यात पहिल्यांदा नो हॉर्न डे साजरा करण्यात आला होता.

- संजय राऊत, निवृत्त आर टी ओ अधिकारी

 

Web Title: Now a day free from horns, every Monday is No Horn Day in Udyog Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.