शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात शरद मोहोळचा साथीदारानेच केला ‘गेम’! लग्नाचा वाढदिवशीच चार गोळ्या झाडत काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 13:14 IST

ही घटना सुतारदरा येथील मोहोळ याच्या कार्यालयासमोरच घडली. पोलिस आरोपींचा शोध घेत असून, लगेच ठिकठिकाणी नाकाबंदीदेखील करण्यात आली होती. 

पुणे : कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास बंदुकीतून चार गोळ्या झाडण्यात आल्या. मोहोळ याचा साथीदार साहील ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने अन्य साथीदारांच्या मदतीने गोळीबार केला. लगेच  मोहोळ याला खासगी रुग्णालयात व त्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

ही घटना सुतारदरा येथील मोहोळ याच्या कार्यालयासमोरच घडली. पोलिस आरोपींचा शोध घेत असून, लगेच ठिकठिकाणी नाकाबंदीदेखील करण्यात आली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ याच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यामुळे कोथरूड येथील त्याच्या स्वत:च्या कार्यालयात नातेवाइक आणि शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी होती. 

शुभेच्छा स्वीकारल्यानंतर देवदर्शनासाठी कार्यालयातून तो बाहेर पडत होता. इतक्यात गर्दीतून चारजण पुढे आले. त्यांनी जवळूनच मोहोळ याच्यावर बंदुकीतून बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये त्याच्या खांद्याला व त्याखाली गोळ्या लागल्या. 

बारा तासांच्या आत आरोपींना बेड्या- गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येनंतर बारा तासांच्या आत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला आरोपींना पकडण्यात यश आले. गुन्हा घडल्यानंतर लगेच गुन्हे शाखेची नऊ तपास पथके पुणे शहर, ग्रामीण आणि सातारा, कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. - पोलिस तपासादरम्यान पुणे-सातारा रस्त्यावरील किकवी-शिरवळ दरम्यान एका स्विफ्ट गाडीत आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या चारचाकीचा पाठलाग करून गुन्हे शाखेने साहील ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर या मुख्य आरोपीसह अन्य सात आरोपींना ताब्यात घेतले.- यावेळी आरोपींकडे ३ पिस्टल, ३ मॅगझिन, ५ राउंड आढळून आले. यासह पोलिसांनी दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, आरोपींनी हा गुन्हा जमिनीच्या आणि पैशांच्या जुन्या वादातून केल्याचे पोलिसांना सांगितले.

पत्नीचा राजकीय पक्षात प्रवेशकातिल सिद्दीकीच्या खुनानंतर मोहोळने त्याची प्रतिमा देशभक्त म्हणून निर्माण केली होती. त्याच्या पत्नीने नुकताच सत्ताधारी राजकीय पक्षात प्रवेश केला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू