शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: गणेश मारणे व विठ्ठल शेलारच्या पोलिस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 12:00 IST

मारणे व शेलार यांच्या मोक्का कोठडीत मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दि. १७ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली....

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात मुख्य सूत्रधार गणेश मारणे व विठ्ठल शेलार आहेत. त्यांच्या मोबाइलमधील कॉल रेकॉर्डिंग तपासायचे आहेत, तसेच मोक्का कोठडीत असलेल्या अन्य आरोपींसोबत त्यांची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यासाठी मारणे व शेलारच्या मोक्का कोठडीत तीन दिवसांची वाढ करावी, तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी केली. त्यानुसार मारणे व शेलार यांच्या मोक्का कोठडीत मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दि. १७ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली.

मोहोळ खूनप्रकरणी मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह हल्लेखोर साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अभिजित अरुण मानकर यांच्या ‘मोक्का’ कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. शरद मोहोळचा खून झाल्यानंतर आरोपी गणेश मारणे व विठ्ठल शेलार हे फरार झाले होते. या कालावधीत त्यांना कोणी मदत केली, तसेच त्यांनी काही मालमत्ता खरेदी केली आहे का, याचा तपास पोलिस करणार आहेत. त्यासाठी मारणे व शेलारच्या मोक्का कोठडीत तीन दिवसांची वाढ करावी, तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. बचाव पक्षातर्फे ॲड. राहुल देशमुख, ॲड. केतन कदम आणि ॲड. दादासाहेब भोईटे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर मारणे व शेलारच्या मोक्का कोठडीत वाढ केली, तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, या प्रकरणात गणेश मारणे पंधरा दिवसांपासून, तर विठ्ठल शेलार २३ दिवसांपासून कोठडीत आहे.

.....

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे