शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुरंदर विमानतळासाठी अधिसूचित क्षेत्र जाहीर : सात गावांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 12:23 IST

पुरंदर येथे ‘छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर केले आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना ६० दिवसांत हरकती- सूचना नोंदविता येणारपुरंदर येथे विमानतळसाठी २ हजार ८३२ हेक्टर जागा लागणार ८३२ हेक्टर जागेवर विमानतळासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा

पुणे : प्रस्तावित पुरंदरविमानतळ उभारण्यासाठी अधिसूचित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांचा यामध्ये समावेश असून, या संपूर्ण क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने ठेवला आहे. त्यामुळे येत्या ६० दिवसांत या परिसरातील शेतकऱ्यांना याबाबतच्या हरकती सूचना नोंदवण्याचे आवाहन या कंपनीने केले आहे. पुरंदर येथे ‘छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर केले आहे. या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचा उद्देश आहे. त्यानुसार पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या गावातील हद्दीचे नकाशे जाहीर केले आहे. पुरंदर येथे विमानतळसाठी २ हजार ८३२ हेक्टर जागा लागणार आहे. यासाठी कंपनीला विशेष अधिकार दिले आहेत. २ हजार ८३२ हेक्टर पैकी २ हजार हेक्टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारणीसाठी लागणार आहे. विमानतळाचा मास्टर प्लॉन तयार करण्याचे काम यापूर्वीच कंपनीकडून डार्स या कंपनीला दिले आहे. तर उर्वरीत ८३२ हेक्टर जागेवर विमानतळासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा कंपनीकडून करणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची मुंबई येथे डिसेंबर २०१८ मध्ये बैठक झाली होती. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना नियोजन कायदा १९६६ च्या तरतुदीनुसार त्यामध्ये उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना विकास योजना तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. त्यानुसार या कंपनीकडून हद्दीची अधिसूचना प्रसिध्द केली आहे. या सात गावातील विमानतळासाठी किती क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. कोणत्या गावातील जमिनी यामध्ये जाणार आहे. याची सर्व्हे नंबर निहाय माहिती या नकाशांमध्ये उपलब्ध केली आहे.चौकट मुंबईतील कार्यालयात हरकती नोंदवण्याची सोयपुरंदर विमानतळासाठीच्या सूचना व हरकती शेतकºयांना नोंदविता येणार आहे.  त्यासाठी मुख्य नियोजनकार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, आठवा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई-५ येथील कार्यालयात हरकती देता येणार आहे. ...........................गावनिहाय भूसंपादन होणारे संभाव्य क्षेत्र - पारगाव-१०३७ हेक्टर - खानवडी-४८४ हेक्टर  - वनपुरी-३३९ हेक्टर - कुंभारवळण-३५१ हेक्टर - उदाची वाडी-२६१ हेक्टर - एखतपूर-२१७ हेक्टर - मुंजवडी- १४३ हेक्टर 

टॅग्स :purandarपुरंदरAirportविमानतळFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी