महापौरच नाही भाजपलाच खोटे बोलण्याचा आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:43+5:302021-04-11T04:10:43+5:30
पुणे: केंद्र सरकारने पुणे शहराला अडीच लाख कोरोना लसींचा पुरवठा केला, हा महापौर मुरलीधर मोहोळ यांचा दावा खोटा ठरला ...

महापौरच नाही भाजपलाच खोटे बोलण्याचा आजार
पुणे: केंद्र सरकारने पुणे शहराला अडीच लाख कोरोना लसींचा पुरवठा केला, हा महापौर मुरलीधर मोहोळ यांचा दावा खोटा ठरला आहे. फक्त महापौरच नाही, तर राज्यातील भाजपच्या सगळ्याच नेत्यांना खोटे बोलण्याचा आजार झाला आहे, अशी टीका माजी आमदार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.
केंद्र सरकारने कोरोना लसीचे ४ लाख डोस राज्यासाठी पाठविले. त्यातील १ लाख डोस पुणे जिल्ह्यासाठी आहेत. त्यापैकी ५० हजार डोस ग्रामीण भागाला, २० हजार डोस पिंपरी-चिंचवड भागांसाठी आणि ३० हजार डोस पुणे शहरासाठी ही यातली वस्तुस्थिती आहे.
असे असताना केंद्र सरकारने पुण्याला अडीच लाख कोरोना लसीच्या डोसची व्यवस्था करुन दिली, असे ट्विट महापौर मोहोळ यांनी केले व लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. त्यांचा हा प्रयत्न उगाचच श्रेय घेण्याचा आहे, असा आरोप जोशी यांनी केला.