शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'माझी नाही तर कोणाची नाही', एकतर्फी प्रेमातून आयटीत काम करणाऱ्या महिलेवर जीवघेणा हल्ला

By विवेक भुसे | Updated: July 13, 2023 15:45 IST

महिलेने मी तुझी फक्त मैत्रीण राहु शकते, असे सांगून त्याचा नंबरही ब्लॉक केला होता

पुणे : खराडी येथील आय टी कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्याने लाकडी दांडग्याने प्राणघातक हल्ला केला. कोरेगाव पार्क पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. संकेत शहाजी म्हस्के (वय २६, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे त्याचे नाव आहे. याबाबत येरवडा येथील ३७ वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट येथे बुधवारी सकाळी सात वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या खराडी येथील आय टी कंपनीत नोकरी करतात. त्यांचा घटस्फोट झाला आहे. काही महिन्यांपूर्वी संकेत म्हस्के याच्याशी त्यांची भेट होऊन ओळख झाली होती. त्याच्याबरोबर आणखी एकाबरोबर त्यांची मैत्री झाली होती. दरम्यान, त्यांचा घटस्फोट झालेला पती पुन्हा त्यांच्या संपर्कात आला होता. संकेत म्हस्के याने एक महिन्यांपूर्वी माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडते, असे म्हणून फिर्यादीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी आपला पती पुन्हा संपर्कात असून मी तुझी फक्त मैत्रीण राहु शकते, असे सांगितले होते. त्याचा नंबरही ब्लॉक केला होता. काही दिवसांनी त्यांनी त्याला पुन्हा अनब्लॉक केले. फिर्यादी या बुधवारी सकाळी सात वाजता बर्निग घाट येथे एका मित्राकडे आल्या होत्या. त्यावेळी संकेत रिक्षातून आला. त्याने पाठीमागून येऊन फिर्यादीला पकडले. तू मला भेटत का नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला खूप आवडते, तू माझी होऊ शकत नाही तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करत त्याने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या हातावर जोरात मारले. त्या खाली पडल्यावर त्यांच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून संकेत म्हस्के पळून गेला. फिर्यादी यांच्यावर खासगी रुग्णालयातील अति दक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक वराळे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाITमाहिती तंत्रज्ञान