ओबीसीत एकही नकली समाविष्ट होणार नाही; चिंता करू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 06:49 IST2025-09-15T06:47:59+5:302025-09-15T06:49:29+5:30
ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही. याची काळजी त्या जीआरमध्ये घेण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ओबीसीत एकही नकली समाविष्ट होणार नाही; चिंता करू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
पुणे : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारचा तो जीआर ओबीसींवर गदा आणणारा नाही. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे, बिना नोंदींचे कोणालाही प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही. याची काळजी त्या जीआरमध्ये घेण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजांतील नेते खरी वास्तविकता काय आहे? हे समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत तोपर्यंत दोन्ही समाजांतील तेढ कमी होणार नाही. मी सांगतो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल, कुणबी नोंद नसेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही.
प्राध्यापकांची ८० टक्के पदे लवकरच भरणार
प्राध्यापक पद भरतीच्या प्रक्रियेवरून अडचणी होत्या. राज्यपालांनी ही भरती पारदर्शक पद्धतीने व्हावी. त्यासाठी प्रक्रियेत बदल सुचविले होते. आता लवकरच प्राध्यापकांची ८० टक्के रिक्त पदे लवकरच भरली जातील असे फडणवीस यांनी सांगितले.