शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pune Vidhan Sabha: उत्तर पुण्यातील इच्छुकांनी आमदारांची वाढवली चिंता; विद्यमानांपुढे तगडे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून खेड, जुन्नर आणि आंबेगावमधील तीन विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित

पुणे: उत्तर पुण्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ येतात. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून खेड, जुन्नर आणि आंबेगावमधील तीन विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिले असले तरी इच्छुकांनी त्यांची धाकधूक वाढवली आहे. विद्यमानांपुढे तगडे आव्हान निर्माण केले आहे. दरम्यान, शिरूरला आमदार ॲड. अशोक पवार यांच्यासमोर उमेदवार मिळत नसल्याची चर्चा सुरू झाली असतानाच माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी अजित पवार गटात प्रवेश करत शिरूरचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

हवेलीच्या अस्मितेचा प्रश्न गाजणार

शिरूर विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. विद्यमान आमदार अशोक पवार हे देखील तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून घोडगंगा कारखान्यामुळे अशोक पवार अडचणीत असल्याच्या चर्चा होत्या. इतकंच नाही तर निवडणुकीतही मोठी कसरत करावी लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र, तरीही लोकसभा निवडणूक काळातच पवार यांनी शिरूरची मोट बांधून पक्की केली. इतकेच नाही तर इच्छुकांचाही बंदोबस्त करत महायुतीला उमेदवार शोधायला लावला. ही जागा आता अजित पवार गटात जाणार हे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी सोमवारी थेट अजित पवार गटात प्रवेश केला. तसेच त्यांनाच उमेदवार देण्यात येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. त्यांना जर उमेदवारी मिळाली तर पुन्हा एकदा हवेलीच्या अस्मितेचा प्रश्न गाजणार आहे. कारण कित्येक वर्षांपासून शिरूरला हवेलीचा आमदार होण्याचे स्वप्न इथल्या नागरिकांचे आहे. त्यांना इतर सर्वपक्षीय पाठिंबा मिळण्याचीही चर्चा असल्याने विद्यमान आमदारांसमोर कडवे आव्हान उभे राहू शकते.

अतुल बेनकेंच्या अडचणी वाढल्या

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेत्या आशा बुचके यांनीही दंड थोपटले आहे. रविवारी बुचके यांनी ओझर येथे निर्धार मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. उपस्थितांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. शिवाय त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्धारही केला आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वपक्षातून त्यांना मोठी सहानुभूती आहे, तर दुसरीकडे उमेदवारीच्या रेसमध्ये सत्यशील शेरकर यांचे नाव आघाडीवर होते. कारणही तसेच होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ज्या ज्या वेळी जुन्नर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी सत्यशील शेरकर यांना झुकते माप दिलेच; शिवाय पक्षातील इच्छुकांना एकत्रित बसून नाव निश्चित करण्यास सांगितले हाेते. मात्र अद्यापपर्यंत तसे काही झाले नाही. त्यामुळे शेरकर हेच उमेदवार असल्याचे बोलले जात असतानाच आता माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे यांचेही नाव आता उमेदवारीसाठी पुढे येऊ लागले आहे. माजी मंत्री वल्लभ बेनके यांना शरद लेंडे यांची निवडणूक काळात खूप मदत होत होती. मात्र, आता तसे होणार नाही, त्यातच उबाठाकडून माऊली खंडागळेही इच्छुक असल्याचे समजते.

वळसे-पाटील, निकम यांच्या डोक्याला ताप

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांच्यातच लढत होणार असे वाटत होते. मात्र, उबाठाचे रमेश येवले यांनीही मैदानात एन्ट्री केली आहे. आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यातील गंगापूर खुर्द हे रमेश येवले यांचे गाव. गेल्या एक-दीड वर्षापासून येवले आपत्तीग्रस्तांना मदत, गावाच्या विकासकामांना भरीव मदतदेखील करत आहे. त्यामुळे त्यांचा चांगला जनसंपर्क असल्याने वळसे-पाटलांची डोकेदुखी वाढली. तर दुसरीकडे रमेश येवले हे जरी उबाठाचे असले तरी काही दिवसांपासून गावभेटीदरम्यान येवले यांच्या सोबत शरद पवार गटाचे लोक दिसत आहेत. त्यामुळे देवदत्त निकम यांची उमेदवारीही धोक्यात आली आहे. येवलेंना थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्याला काही यश आले नाही.

मोहिते-पाटलांना देशमुखांचे आव्हान

खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत. अद्यापपर्यंत त्यांनी उमेदवार निश्चित केला नाही. शरद पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, सुधीर मुंगसे इच्छुक असल्याने तेढ निर्माण झाला. यामुळे अतुल देशमुख यांनी रविवारी निर्धार मेळावा आयोजित केला होता. मात्र, तो झाला नाही. कारण शरद पवार गटाकडून त्यांना थांबवल्याचे समजते. २०१९ ची निवडणूक पाहिली तर तिसऱ्या क्रमांकाची मते अतुल देशमुख यांना मिळाली होती. सध्या त्यांनी लढण्याचा निर्धार केला आहे. त्याला जर सर्वपक्षीयांचा पाठिंबा मिळाला तर मोहिते-पाटलांसमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४junnar-acजुन्नरkhed-alandi-acखेड आळंदीambegaon-acआंबेगावSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार