शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही बिनविरोध करता का? चंद्रकांत पाटलांचे नाना पटोलेंना प्रत्यत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 13:44 IST

भाजपकडून या निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली, ती टिळक परिवाराला देण्यात आली नसल्याची पटोले यांची टीका

पुणे: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेंबाची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम पक्ष महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंदकांत पाटील, बाळासाहेंबाची शिवसेनेेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. परंतु रॅलीला टिळक कुटुंबीयांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. तसेच नाना पटोले यांनी शैलेश टिळक यांना उमेदवारी नाकारल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांना प्रत्युत्तर देत स्पष्टीकरण दिले आहे. 

ही पोटनिवडणूक बिनविरोध करायची नसल्यामुळे नाना पटोले असे म्हणतात की, टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती तर आम्ही बिनविरोधचा विचार केला असता. माझे नाना पटोलेंना आवाहन आहे, टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही बिनविरोध करता का?" असा सवाल पाटलांनी उपस्थित केला आहे. अजूनही २४ तास बाकी आहेत. आमच्या विधानाचा पटोले यांनी विचार करावा असेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. तर भाजपने चिंचवडमध्ये जगतापाच्या घरात उमेदवारी दिली आहे, त्याठिकाणी आघाडी उमेदवार देणार आहे, त्याचे काय? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.  

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष 

मुक्ता टिळक यांना गेल्या वेळेची पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले होते. तेव्हा मीसुद्धा उमेदवारी मागितली होती. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याने आमच्याकडे नाराजीची भाषा चालत नाही. विरोधात कोणीही असो कसाही प्रचार करो, भाजप आणि मित्र पक्षांच्या बळावर आम्ही विजय मिळवणारच आहोत. असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे. 

सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही 

भाजपकडून या निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली, ती टिळक परिवाराला देण्यात आली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिला होता तो जो प्रस्तावाला आता अर्थ राहिला नाही. सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली होती. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारणSocialसामाजिक