शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एक वेळ नाही दिवसाआडच पाणी पुरवठा करावा लागणार : महापालिकेचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 14:21 IST

पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या ११५० एमएलडी पाणी साठ्यात संपूर्ण शहराला एक वेळ पाणी पुरवठा करणे देखील कठीण आहे. यामुळे एक वेळेऐवजी दिवसाआडच पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाच्या कोट्यात भागविणे अवघडभविष्यात पुणेकरांना मोठ्या पाणी कपातीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्टशहराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी मंगळवार (दि.२३) रोजी सर्व पक्षनेत्यांची बैठक

पुणे: दिवाळीनंतर शहराला एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने सोमवारी (दि.२२)रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले. परंतु पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या ११५० एमएलडी पाणी साठ्यात संपूर्ण शहराला एक वेळ पाणी पुरवठा करणे देखील कठीण आहे. यामुळे एक वेळेऐवजी दिवसाआडच पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. यामुळे भविष्यात पुणेकरांना मोठ्या पाणी कपातीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.      सध्या संपूर्ण पुणे शहराला किमान समान पाणी पुरवठा करण्यासाठी १३५० एमएलडी पाण्याची दररोज गरज असते. परंतु दिवाळीनंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने केवळ ११५० एमएलडीच पाणी शहरासाठी देण्यात येणार आहे. यामुळे एक वेळ पाणी पुरवठा करण्याचे ठरले तरी शहरासाठी तब्बल २०० एमएलडीचा तुटवडा निर्माण होतो. उन्हा प्रचंड तडाखा, यामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन हे पाहता शिल्लक पाणीसाठा पुढील आठ महिने पुरवावा लागणार आहे. तसेच ११५० एमएलडीमध्ये एक वेळ पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याचे मत प्रशासनाचे आहे. त्यामुळे भविष्यात एक वेळ ऐवजी दिवसा आड पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून, पुणेकारांना पाणी कपातीच्या मोठ्या संकटाला तोड द्यावे लागणार आहे.--------------शहराला पाणी पुरवठा करणा-या धरणातील पाणी साठा: टेमघर : ०.८० टीएमसीवरसगांव : १२.७४ टीएमसीपानशेत : १०.०५ टीएमसीखडकवासला : १.३४ टीएमसीएकूण : २४.९९ टीएमसीपुणे शहरासाठी राखीव : ११.५० टीएमसी----------------------पक्षनेत्यांच्या बैठकीत पाणी कपातीचे नियोजन पुणेकरांना पाणी कमी पडू न देण्याची जबाबादारी महापालिकेची आहे. त्यामुळे धरणातून शहरासाठी उपलब्ध होणारे पाण्याचे प्रशासनाकडून योग्य पध्दतीने नियोजन करण्यासाठी सत्ताधारी म्हणून आम्ही सर्व आग्रही आहोत. त्यामुळे शहराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी मंगळवार (दि.२३) रोजी सर्व पक्षनेत्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीसाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत शहराच्या पाणी कपातीचे नियोजन ठरविण्यात येणार आहे.- महापौर मुक्ता टिळक

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीMukta Tilakमुक्ता टिळकSaurabh Raoसौरभ राव