शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमचीच सत्ता आणि आम्हालाच मिळेना पाणी! भाजप नगरसेवकांनी वाचला तक्रारींचा पाढा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 19:36 IST

अपर इंदिरानगर, धनकवडी, इंदिरानगर, पर्वतीगाव,  कसबा पेठ, खडकी, जुना पुणे मुंबई रस्ता, या परिसरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या. भाजप वर आली बैठक बोलावण्याची वेळ.

ठळक मुद्देआवश्यक ती कारवाई करण्याच्या बिडकर यांनी दिल्या सूचना

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून देखील पुरेसे पाणी मिळत नाही. पाणी सोडणारे सभासदांना उलट उत्तरे देतात. अधिकारी फोन उचलत नाहीत, सत्ताधारी असतानाही अशा अडचणी असतील तर दाद मागायची कोणाकडे ? असा प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षाच्या सभासदांनी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. शहरातील विविध भागात पाण्याची समस्या सोडविण्यात यावी, यासाठी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पालिकेत एक बैठक झाली. या बैठकीत नगरसेवकांनी प्रभागात पाणी पुरवठ्याबद्दल येत असलेल्या अडचणी सांगितल्या. नगरसेविका राणी भोसले, रुपाली धाडवे, वर्षा साठे, रघू गौडा, प्रकाश ढोरे, योगेश समेळ पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप, मनीषा शेकटकर यांच्यासह पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

गेल्या काही महिन्यांपासून अपर इंदिरानगर, धनकवडी, इंदिरानगर, पर्वतीगाव,  कसबा पेठ, खडकी, जुना पुणे मुंबई रस्ता, या परिसरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत असून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याकडे यासाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील केवळ दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. पालिकेत सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप काम करत आहे. सत्ताधारी असतानाही आम्हाला पाणी मिळत नसेल तर काय उपयोग? पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की एक दिवस सुरळीत पाणी मिळते, पुन्हा दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी मिळते. भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागात जाणीपूर्वक पाणीपुरवठा कमी दाबाने होतो की काय? अशी शंका यावेळी सभासदांकडून व्यक्त करण्यात आली.

कारवाई करण्याच्या बिडकर यांच्या सूचना शहरातील सर्व भागांना आवश्यक तो पाणीपुरवठा झालाच पाहिजे. प्रशासनाने त्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. काही भागातील पाणी सोडणारे (व्हॉल्व मन) मनमानी करत असल्याच्या तक्रारी आहेत. सर्व सभासदांनी उपस्थित केलेल्या शंकाचे समाधान करून पुढील चार ते पाच दिवसात पाण्याच्या सर्व समस्या सोडवाव्यात. त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना बिडकर यांनी दिल्या आहेत.    

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीBJPभाजपा