शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मृत्यूनंतरही पाऊस सोडेना पाठ..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 19:36 IST

हातात धरून बांधली तिरडी : दु:खातही लोकांच्या मदतीसाठी धावला मुलगा..

लक्ष्मण मोरे-  पुणे : एकीकडे अंत्यविधीची तयारी सुरू होती... दुसरीकडे मुसळधार पावसामुळे पाणी घरात घुसायला सुरुवात झाली... वयोवृद्ध आईच्या उशाला बसलेल्या मुलाला काय करावे सुचेना... अशातच आसवांना बांध घालून नातेवाईकांनी मृतदेह हातामध्ये उचलून घेतला... तोवर घरातील पाण्याची पातळी वाढली... नाइलाजाने मृतदेह हातामध्ये धरूनच तिरडी बांधावी लागली... शिवदर्शन येथील भारत तेलंग या सामाजिक कार्यकर्त्याच्या कुटुंबाला या दु:खदायक प्रसंगाला बुधवारी सामोरे जावे लागले. तेलंग यांनी दोन आठवड्यांपूर्वी सहकारनगर, अरण्येश्वर, टांगेवाले कॉलनी परिसरात आलेल्या पुरादरम्यान मदत व बचाव कार्यात हिरिरीने सहभाग घेतला होता. अनेकांना सुखरूप बाहेर काढून नागरिकांचे संसार वाचविण्यासाठी तेलंग अन्य कार्यकर्त्यांसोबत अहोरात्र झटत होते. बुधवारी त्यांनाच पावसाच्या पाण्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला. तेलंग यांच्या आई वालम्मा आशन्ना तेलंग (वय ८०) यांचे बुधवारी निधन झाले. संध्याकाळी अंत्यविधी असल्याने नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाला होता. संध्याकाळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली. तसेच चेंबरमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर येऊ लागले होते. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसायला सुरुवात झाली. पाहता पाहता तेलंग यांच्याही घरामध्ये पाणी घुसले. खाली ठेवलेला मृतदेह नातेवाईकांनी उचलून घेतला. बाहेर फ्लेक्स बांधून केलेल्या आडोशामध्ये कॉटवर हा मृतदेह ठेवला. ही कॉटही पाण्याखाली जाऊ लागली होती. घरात आणि घराबाहेर पाणी असल्याने तिरडी कशी बांधायची, असा प्रश्न निर्माण झाला. अंत्यविधीसाठी आलेल्या नगरसेवक आबा बागूल, अमित बागूल यांच्यासह कार्यकर्त्यांनी हातामध्ये बांबू घेऊन तिरडी बांधली. हे कमी की काय, रुग्णवाहिकेला पोहोचायला वाहतूककोंडीमुळे दीड तास उशीर झाला. रुग्णवाहिकेमधून मृतदेह वैकुंठ स्मशानभूमीत नेत असतानाही वाहतूककोंडीमुळे तब्ब्बल एक तास लागला. आईवर अंत्यविधी झाल्यानंतर तेलंग पुन्हा घरांमध्ये पाणी घुसलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावले. ‘माझी आई गेली असली तरी समाजातील माझ्या हजारो आयांना मदतीची गरज आहे. त्यासाठी मी कायम धावून जाणार,’ असे तेलंग म्हणाले. .......

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसDeathमृत्यू