शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बीडीपीविषयी राष्ट्रवादीला नाही भूमिका

By admin | Updated: August 19, 2015 00:17 IST

राज्य शासनाने महापालिकेतील समाविष्ट २३ गावांतील जैववैविद्य उद्यानाचे (बीडीपी) आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बीडीपी आरक्षणाच्या परिसरातील

पुणे : राज्य शासनाने महापालिकेतील समाविष्ट २३ गावांतील जैववैविद्य उद्यानाचे (बीडीपी) आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बीडीपी आरक्षणाच्या परिसरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक अडचणीत आले आहेत. तरीही राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महापालिकेच्या हद्दीत १९९७ ला २३ गावांचा समावेश झाला. त्यानंतर या गावांच्या विकास आराखड्याला २००५ मध्ये मान्यता दिली. त्या वेळी डोंगर व उताराच्या भागात सुमारे ९७६ हेक्टर क्षेत्रावर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले. मात्र, आरक्षण चुकीच्या पद्धतीने गावठाण व सपाट भागात टाकण्यात आले आहे; तर काही ठिकाणी डोंगरउताराचा भाग वगळण्यात आला आहे, असा आरोप स्थानिक नगरसेवक व नागरिकांकडून करण्यात आला. त्यामुळे गेल्या १० वर्षांपासून बीडीपी आरक्षणाचा तिढा सुटलेला नव्हता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वी बीडीपीमध्ये बांधकामाला परवानगी न देता आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा बीडीपी आरक्षणाला विरोध असतानाही शहराध्यक्षा अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी निर्णयाचे स्वागत केले. त्यामुळे बीडीपी भागातील नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वंदना चव्हाण यांच्याकडून वैयक्तिक अजेंडा पक्षावर लादला जात असल्याचा आरोप नगरसेवक व कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मात्र, पक्षाच्या इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक व कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.