शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला पाणी कमी पडणार नाही : मुख्यमंत्र्यांचे महापौरांना आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 17:13 IST

जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याबाबत दिलेल्या निकालामुळे पाणी कपातीचे संकट घोंगावू लागले होते...

ठळक मुद्देभाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महापौरांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा आगामी काळात उपलब्ध पाणी साठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेतले जाण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांचे पाणी तोडणार नाही, सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार असून काळजी करू नये असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर मुक्ता टिळक यांना दिले आहे. जालना येथे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी गेलेल्या महापौरांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यांनीही पुणेकरांना दिलासा दिल्याचे टिळक यांनी सांगितले. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याबाबत दिलेल्या निकालामुळे पाणी कपातीचे संकट घोंगावू लागले होते. महापालिकेस वषार्ला 8.19 टीएमसी पाणी द्यावा असा निर्णय दिला तर शासनाने महापालिकेस वषार्ला 11.50 टीएमसी पाणी द्यावे असा करार असल्याने त्या कारारानुसारच पाणी वापरावे असे पत्र पाठविले होते. मागील आठवड्यात महापालिकेचे पाणी तोडण्यात होते. त्यानंतर जलसंपदा अधिकारी आणि महापालिका पदाधिकारी यांची महापालिकेमध्ये बैठक झाली. त्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाला असला तरी, पाणी कपात होण्याची शक्यता होती. याबाबत मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री, जलसंपदा आणि महापालिका पदाधिका?्यांमध्ये बैठक होणार होती. मात्र, ही बैठक होऊ शकली नाही. त्यावेळी महापालिका आयुक्त पाणी वापराबाबत जलसंपदा विभागाला लेखी पत्र देतील आडे ठरले होते. पाण्याबाबत उच्च स्तरीय बैठक होईपर्यंत शहराला 1350 एमएलडी पाणी कमी करू नये असे बैठकीत ठरले होते. दरम्यान, जालना येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महापौर टिळक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना पुण्याचे पाणी कमी करू नये अशी विनंती केली. यावेळी उपस्थित असलेल्या जलसंपदामंत्री महाजन यांनीही संमती दर्शविल्याचे टिळक म्हणाल्या. उपलब्ध पाणी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांना देऊन दोघांचीही निकड कशी भागवता येईल याबाबत विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. तूर्तास तरी पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही. मात्र, आगामी काळात उपलब्ध पाणी साठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेतले जातील अशी शक्यता असल्याने मार्च महिन्यात पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMukta Tilakमुक्ता टिळकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका