शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

नवीन सरकारच्या अंदाजपत्रकातील राष्ट्रीय सुरक्षेबाबतची तरतूद अपुरी : डॉ. विजय खरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 15:41 IST

संरक्षण मंत्रालयाला एकूण ४,३१,०११ कोटी रुपयांची तरतूद या अंदाजपत्रकात पाहावयास मिळते...

ठळक मुद्दे३,०५,२९६ कोटी एवढा खर्च संरक्षण दलावर करण्यात येणार

पुणे : नवीन सरकारच्या पहिल्याच अंदाजपत्रकात संरक्षण सिद्धता व राष्ट्रीय सुरक्षेबाबत भरघोस अशी आर्थिक तरतूद पाहावयास मिळत असली तरी ही तरतूद तशी पुरेशी दिसत नाही. संरक्षण मंत्रालयाला एकूण ४,३१,०११ कोटी रुपयांची तरतूद या अंदाजपत्रकात पाहावयास मिळते. त्यापैैकी रुपये ३,०५,२९६ कोटी एवढा खर्च संरक्षण दलावर करण्यात येणार आहे. बाकी सर्व खर्च पेन्शन, सिव्हिल कामे व इतर किरकोळ खर्चांसाठीची तरतूद केलेली आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या बालाकोट हल्ल्यानंतर संरक्षण सिद्धता, राष्ट्रीय सुरक्षा हे विषय सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे ठरलेले आहेत. त्यामुळे संरक्षणावर नवीन सरकार किती तरतूद करणार आहे, त्याबाबत सर्वसामान्य व विविध विश्लेषकांना उत्सुकता होती. परंतु अंतरिम अंदाजपत्रकातील तरतुदीपेक्षा केवळ ०.०१ टक्के वाढ करण्यात आलेली आहे. सीतारामन यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम केल्यामुळे जास्त तरतूद करण्यात येईल, अशी अपेक्षाही होती. 

संरक्षण दलाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे असल्यामुळे सोव्हिएत संघाकडून घेतलेली जुनी विमाने व नौदलाचे पाणबुडीचे व काही साधनसामग्रीच्या आधुनिकीकरणासोबतच हिंद महासागरातील चीनच्या सैैन्य हालचालींना शह देण्यासाठी आधुनिकीकरणावर भर देण्यासाठी संरक्षण खर्चात वाढ करणे गरजेचे होते. परंतु अर्थमंत्र्यांच्या दोन तासांच्या भाषणात संरक्षण खर्चाबाबत फारशी चर्चा केलेली नाही. केंद्र सरकारच्या एकूण २७.८६ लाख कोटी अर्थसंकल्पापैैकी १०.९५ एवढी तरतूद ही संरक्षणावर केलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून एकंदरीत संरक्षणावरच्या खर्चाच्या तरतुदीमध्ये एकूण जीडीपीचा विचार करता कमी कमी होताना पाहावयास मिळत आहे.२०१४-१५ अर्थसंकल्पाच्या एकूण रकमेपैकी ११.६९ टक्के एवढी रक्कम संरक्षणासाठी होती. पुढे २०१५-१६ ला कमी होताना दिसते. ११.२४ टक्के एवढी दिसते. २०१६-१७ मध्ये १२.५९ टक्के पुन्हा वाढलेली दिसते. २०१७-१८ मध्ये सुधारित बजेट पुन्हा ११.४६ टक्के एवढी दिसते. गेल्या काही वर्षांपासून संरक्षण खर्च हा जीडीपीच्या १.५ टक्के किंवा १.६ टक्के एवढा दिसतो. सुधारित बजेट  २०१५-१६  व २०१८-१९ मध्ये जीडीपीच्या १.४८ किंवा १.४६ एवढा खर्च दिसतो. भारताचा संरक्षण खर्च हा ४४.६ बिलियन डॉलर्स एवढा आहे, जो पाकिस्तानच्या संरक्षण खर्चापेक्षा सहा पटीने जास्त आहे. चीनचा संरक्षण खर्च हा १७७.७ बिलियन डॉलर्स एवढा आहे, तर अमेरिकेचा ७१६ बिलियन डॉलर्स एवढा संरक्षण खर्च आपल्याला पाहावयास मिळतो. स्वीडनच्या स्टॉकहोम येथील ‘सिप्री’ आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या अहवालानुसार जगामधील संरक्षणावर जास्त खर्च करणाºया १५ देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. त्यात अनुक्रमे अमेरिका, चीन, सौदी अरेबिया, भारत, फ्रान्स, रशिया, यूके, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, इटली, ब्राझील, आॅस्ट्रेलिया, कॅनडा व तुर्की यात अमेरिका आपल्या एकूण जीडीपीच्या अमेरिका ३.२ टक्के, चीन १.९ टक्के, सौदी अरेबिया ८.८ टक्के एवढा खर्च करताना आपल्याला पाहावयास मिळते. 

टॅग्स :PuneपुणेUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनDefenceसंरक्षण विभाग