शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पुणे विमानतळावर येताना प्रवाशांची खडखडाट, जाताना भरगच्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 21:05 IST

लॉकडाऊनमुळे दोन महिने बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू झाली.

ठळक मुद्देसध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे शहर केंद्र सरकारच्या रडारवर येणारी व जाणारी विमाने जवळपास तेवढीच असली तरी येणाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी

पुणे : विमानसेवा सुरू झाल्यानंतर पुण्यातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर पुण्यात येणारी विमाने मात्र पुरेशा प्रवाशांअभावी रिकामी धावत असल्याचे चित्र आहे. ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या सारखी असली तर प्रवाशांच्या आकड्यामध्ये जवळपास निम्मा फरक दिसत आहे.लॉकडाऊनमुळे दोन महिने बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू झाली. पुणे विमानतळावरून दिल्ली, बेंगलुरू, अहमदाबाद, कोची, चेन्नई, कोलकाता, हैद्राबाद आदी शहरांसाठी विमानांचे उड्डाण होत आहे. पण सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे शहर केंद्र सरकारच्या रडारवर आहे. रेड झोनमध्ये असल्याने पुण्यातील अनेक भागात निर्बंध आहेत. परिणामी, पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन केले जात आहे. रेल्वेने पुण्यातून लाखो प्रवासी मुळगावी परतले आहेत. आता विमानसेवा सुरू झाल्यानंतरही पुणे सोडण्याला अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. 

विमानफेऱ्या वाढल्यापुणे विमानतळावरून २५ मेला एकुण  १७ विमानांनी ये-जा केले होते. त्यानंतर हा आकडा वाढत गेला. येणारी व जाणारी विमाने जवळपास तेवढीच असली तरी पुण्यात येणाऱ्यांची संख्या जवळपास निम्म्याने कमी आहे. जाणाऱ्यांची संख्या दुप्पट असल्याचे दिसते. शुक्रवारी (दि. २९ मे) सायंकाळी सात वाजेपर्यंत पुण्यात आलेल्या १३ विमानांमधून ५२५ प्रवासी उतरले. तर १२ विमानांचे विमानतळावरून उड्डाण झाले. त्यातून १३९० प्रवासी पुणे सोडून गेले. पुणे सोडून जाणाऱ्या प्रवाशांची मागणी जास्त असली तरी मर्यादीत विमानांचेच उड्डाण करण्याची परवानगी आहे. त्यामुळे सध्या दररोज सरासरी १५ विमानांचे उड्डाण होत आहे. त्यातून जवळपास १५०० प्रवासी जात आहेत.------------मागील पाच दिवसांतील स्थिती                             २५ मे     २६ मे    २७ मे    २८ मे     २९ मे विमाने आली           ९            १४       १७       १२          १३प्रवासी                  ६७२          ७१९      ८३५    ५५२       ५२५विमाने गेली            ८            १४        १६       १२         १२प्रवासी                 ९८५           १४३४   १६६६   १३१३    १३९०--------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याpune airportपुणे विमानतळ