शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

" आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कुणी आलेलं नाही ; आज आमची सत्ता आहे कधीतरी त्यांची येईल..! "

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 4:25 PM

राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून हे सरकार इतक्य दिवसात पडेल तितक्या दिवसात पडेल याप्रकारची वक्तव्ये सातत्याने केली जात आहे...

पुणे : महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र या वर्षभरात राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून हे सरकार इतक्या दिवसात पडेल तितक्या दिवसात पडेल याप्रकारची वक्तव्ये सातत्याने केली जात आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समाचार घेतानाच त्यांना सणसणीत टोला देखील लगावला आहे. 

पुणे पदवीधर निवडणुकीतील महविकास आघाडीच्या उमेदवार असलेले अरुण लाड यांच्या प्रचारार्थ त्या इंदापूर इथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आमची आहे कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही. परंतु, काही लोक सारखे सारखे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असे बोलत असतात. त्यांच्या बोलण्याची मला फार  गंमत वाटते. पण नेहमी रिकामी भांडीच जास्त आवाज करतात मात्र भरलेली भांडी अजिबात आवाज करत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.  

तुम्हाला पाहिजे तितका आवाज करा. आणि समजा आमचे महाविकास आघाडी सरकार पडले तर पुढे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. पण तूर्तास तरी आमचे सरकार स्थिर असून ते आपला कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल असा ठाम विश्वास देखील सुळे यांनी यावेळी व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या..राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपला एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येत असून ते कोरोनावरील लास निर्माण करत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे. अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेली कोरोनावरील लस पुण्यात निर्माण होत आहे यापेक्षा राज्य सरकारचे मोठे दुसरे ते यश काय आहे. असे गौरवोद्गार काढतानाच सुळे यांनी मोदींनाही आता पुणे हवंहवंस वाटू लागले आहे, अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी केली. 

 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNarendra Modiनरेंद्र मोदीState Governmentराज्य सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण