शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या नायडू रुग्णालयातील कोरोनाबाधित व क्वारंटाइन रूग्णांना नाही कसले पथ्यपाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 14:53 IST

पालिकेच्या डॉ नायडू रूग्णालयात कोरोना बाधित व संशयित अशा दोन्ही प्रकारचे १०० पेक्षा जास्त रूग्ण

ठळक मुद्दे जेवणाची घेतात काळजी: सर्वांना दिली जातात फुड पॅकेटस् थंड असे काहीही पिण्यास, खाण्यास त्यांना मनाईबाधित व संशयित अशा दोन्ही रूग्णांचे मनोधैर्य टिकवण्यासाठीही प्रयत्न

पुणे: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना आजाराने बाधित रूग्णांना खाण्यापिण्याचे कसलेही पथ्य नाही. वेळेवर औषधोपचार करण्याबरोबरच या रूग्णांच्या जेवणाचीही काळजी रूग्णालय व्यवस्थपनाकडून दररोज घेतली जात आहे. पालिकेच्या डॉ नायडू रूग्णालयात कोरोना बाधित व संशयित अशा दोन्ही प्रकारचे १०० पेक्षा जास्त रूग्ण आहेत. संशयित रूग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. बाधित रूग्णांसाठी वेगळा कक्ष आहे. या सर्व रूग्णावर आवश्यक ते औषधोपचार नियमीतपणे केले जात आहेत. त्याबरोबरच त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली जात आहे. या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून असलेले पालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ संजीव वावरे म्हणाले, या रूग्णांना खाण्यापिण्याचे पथ्य नाही, मात्र त्यांना घरचे जेवण घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. रूग्णालयात वर्दळ वाढेल म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. या सर्व रूग्णांच्या जेवणाची व्यवस्था रूग्णालय व्यवस्थापन करत आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे.सकाळी त्यांना चहा देण्यात येतो. त्यानंतर दुपारी व सायंकाळी त्यांना जेवण दिले जाते. त्यात नेहमीची पोळीभाजी भात आमटी असते. दुपारचा चहाही देण्यात येतो. त्याबरोबर बिस्किटे असतात. मात्र ती नसतील तर फक्त चहा देण्यात येतो. थंड असे काहीही पिण्यास, खाण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. त्यांची प्रतिकार शक्ती कमी होऊ नये, त्यात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. बाधित व संशयित अशा दोन्ही रूग्णांचे मनोधैर्य टिकवण्यासाठीही प्रयत्न केले जातात. ते चांगले आहे अशी माहिती डॉ वावरे यांनी दिली.इतक्या लोकांचे जेवण रूग्णालयात तयार करणे शक्य नाही. त्यामुळे ते बाहेर बनवले जाते व तिथून फूड पँकेटस तयार करून ते रूग्णालयात आणले जातात. नंतर त्यांचे वाटप होते असे ते म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलfoodअन्नfruitsफळेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस