शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालय परिसरातच'फिजिकल डिस्टन्स' चे होत नाही पालन ; कोरोना संसर्ग होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 20:03 IST

शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात आरोपींसह पोलीस व वकील वर्गाकडून फिजिकल डिस्टसिंगचे उल्लंघन

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने न्यायालयाच्या कामकाजात बदल लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत शिथिलता दिल्यानंतर गुन्ह्यांमध्ये वाढ

पुणे : न्यायालयात फिजिकल डिस्टन्स ठेवणे अवघड होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मात्र कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. न्यायालय प्रशासन आणि बार असोसिएशनने नागरिकांना विनाकारण न्यायालयात येऊ नये असे आवाहन केले आहे. परंतु नागरिक त्या सुचनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात आरोपींसह पोलीस व वकील वर्गाकडून फिजिकल डिस्टसिंगचे उल्लंघन होत आहे. एकत्र येऊन गप्पा मारणे, मास्कचा वापर न करणे, विनाकारण गर्दी करणे, फिरणे, बोलताना मास्क काढणे तसेच ठराविक अंतर न पाळत कोर्ट रुमबाहेर गर्दीने उभे राहिल्याचे चित्र गुरूवारी दिसून आले. गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यानंतर 24 तासांत न्यायालयात हजर करणे बंधनकारक आहे. न्यायालयीन कामकाज सुरू रहावे तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने न्यायालयाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेतच न्यायालयाचे काम सुरू आहे. यावेळी फक्त महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत शिथिलता दिल्यानंतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यासह जामीनासाठीही वकिलांची वर्दळ सुरू होती. मात्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांचे एक कोर्ट सुरू असल्याने त्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. न्यायालयातील नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कोर्टरूमध्ये झालेल्या गर्दीतून वाट काढत न्यायालयीन कर्मचार्‍यांना काम करावे लागत होते. सरकारी वकील व कर्मचार्‍यांना अनेकदा सांगूनही अनेकांकडून ठराविक अंतराचे पालन होताना दिसून आले नाही. न्यायालयात होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी नुकतेच परिपत्रक काढून पक्षकारांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे सांगितले. तसेच, जामीनाच्या आदेशानंतर फक्त एकाच जामीनदाराला न्यायालयाच्या आवारात प्रवेश तसेच ज्या वकीलांचे काम नाही त्यांनी कोर्टात जाऊ नये आणि पक्षकारांना आत सोडण्यासाठी कोणीही आग्रह करू असा आदेश दिला होता. मात्र, सध्यस्थितीत न्यायालयीन कामकाजासाठी प्रवेश मिळालेल्यांकडून नियमांकडे देखील दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसadvocateवकिलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस