शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांवर सरसकट फौजदारी कारवाई नको, मुख्यमंत्र्यांना देणार पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 19:56 IST

पोलिसांनी संबंधित घटनेला बांधकाम व्यावसायिक कितपत जबाबदार आहे, याची खातरजमा करुनच फौजदारी अथवा दिवाणी कायद्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे....

ठळक मुद्देक्रेडाई : मुख्यमंत्र्यांना पुन्हा देणार सविस्तर पत्रमोफा कायद्याबाबत कारवाई करताना देखील ग्राहकाशी केलेल्या कराराची पडताळणी नाही.

पुणे : बांधकाम व्यावसायिकांवर महाराष्ट्र ओनरशिप आॅफ फ्लॅट अ‍ॅक्ट (मोफा) प्रमाणे केली जाणारी फौजदारी कारवाई आणि बांधकाम प्रकल्पावरील दुर्घटने प्रकरणी सरसकट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु नये, याबाबत कॉन्फडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन महाराष्ट्र (क्रेडाई) मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सविस्तर पत्र लिहिणार आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकांवरील गुन्ह्यातील कायदेशीरबाबी तपासण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र विभाग स्थापन करावा अशी मागणी त्यात करण्यात येणार असल्याचे क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच दिलेल्या पुणे भेटीत बांधकाम व्यावसायिकांनी त्यांची भेट घेतली. तसेच, बांधकाम व्यावसायिकांवर दाखल होणाऱ्या फौजदारी गुन्ह्यांविषयी त्यांनी गाºहाणे मांडले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना लोकमत शी बोलताना कटारिया म्हणाले, ग्राहकांची फसवणूक आणि बांधकाम प्रकल्पावरील दुर्घटनेबाबत बांधकाम व्यावसायिकांवर सरसकट फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जात आहे.  मात्र, या गुन्ह्यासाठी बांधकाम व्यावसायिक खरेच दोषी आहे  की नाही, हे पाहीले जात नाही. अनेकदा दिवाणी स्वरुपाचा गुन्हा असला तरी फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. पोलिसांनी कायद्याच्या आधीन राहून कारवाई केली पाहिजे. याचा अर्थ सर्वच बांधकाम व्यावसायिकांवर फौजदारी कारवाई करु नये असे नाही. मात्र, गुन्ह्याचे स्वरुप पाहून कारवाई झाली पाहिजे. अनेकदा संबंधित अपघाताशी बांधकाम व्यावसायिकांचा थेट संबंध नसतो. बांधकाम व्यावसायिकांनी संबंधित प्रकल्प दुसऱ्या व्यक्तीला करायला दिलेला असतो. अशा प्रकल्पातील दुर्घटनेबाबतही मूळ  बांधकाम व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल होतो. हा प्रकार चुकीचा आहे. पोलिसांनी संबंधित घटनेला बांधकाम व्यावसायिक कितपत जबाबदार आहे, याची खातरजमा करुनच फौजदारी अथवा दिवाणी कायद्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे, असे कटारिया म्हणाले. मोफा कायद्याबाबत कारवाई करताना देखील ग्राहकाशी केलेल्या कराराची पडताळणी केली जात नाही. ग्राहकाला सदनिकेचा ताबा कधी द्यायचा, खरेदीखत, सोसायटी याबाबत करारात काय लिहिले आहे, याची शहानिशा न करता कारवाई केली जाते. कायद्याच्या कक्षेनुसारच कारवाई झाली ही भूमिका सातत्याने मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे मांडण्यात आली आहे. या गुन्ह्यांच्या तपासणीसाठी विशेष विभाग स्थापला पाहिजे. कायद्याच्या कक्षेत येणारी कारवाई करावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. पुन्हा एकदा याबाबत सविस्तर पत्र मुख्यमंत्र्याना देण्यात येणार असल्याचे कटारिया म्हणाले.  

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसCrimeगुन्हा