शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक पातळीवर कुणालाही कर्फ्यू लावता येणार नाही : जिल्हाधिकारी नवल किशोर राम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 20:12 IST

जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवर कर्फ्यू लावता येणार नाही.

ठळक मुद्देकोणी असे निर्णय घेतल्यास कठोर कारवाई करणारसरपंच, गावातील काही ठराविक लोकांच्या आग्रहाखातर असे लॉकडाऊन जाहीरस्थानिक पातळीवर प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाचे आदेश नसताना आडमुठे निर्णय घेणे चुकीचेजिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर सुरु

पुणे : कोणत्याही भागात लॉकडाऊन, कर्फ्यू लावण्याचे अथवा वाढविण्याचा अधिकार जिल्हाधिकारी अथवा सक्षम अधिकारी यांनाच आहे. जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायत अथवा, नगरपंचायत, नगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवर कर्फ्यु लावता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. या संदर्भांत सर्व यंत्रणांना स्पष्ट आदेश दिले आहे. स्थानिक पातळीवर कोणी असे निर्णय घेतल्यास कारवाई करण्यात येईल, असे देखील स्पष्ट केले.

सध्या शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कोरोनाच्या धास्तीने काही तालुक्यांमध्ये अनेक ग्रामपंचायती, नगरपालिका कोणी सात दिवस, कोणी पंधरा दिवस तर कोणी केवळ तीन दिवसांसाठी देखील संपूर्ण गाव, नगरपालिकांमध्ये कर्फ्यु लावला जात आहे. हा कर्फ्यु लावताना कोणतेही नियम लक्षात घेतले जात नाही, स्थानिक सरपंच, गावातील काही ठराविक लोकांच्या आग्रहाखातर असे लॉकडाऊन जाहिर केले जात आहे. परंतु यामुळे गावातील अथवा स्थानिक भागातील नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे. गावांच्या विरोधात जाण्याची कोणाची तयारी नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावाने, नगरपालिकेने काळजी घेणे आवश्यक आहे. पण स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाचे आदेश नसताना आडमुठे निर्णय घेणे चुकीचे आहे.जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले की, अशा प्रकारे एखाद्या गावाला किंवा, वाड्या, वस्ती अथवा नगरपालिकेला स्थानिक पातळीवर कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेता येणार नाही. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर सुरु केले आहेत. या सेंटरमध्येच संशयित  व्यक्तींना क्वारटाईन करण्याची सोय केली आहे.--गावा-गावांमधील स्वयंम घोषित क्वारंटाईन सेंटर धोक्याचेसध्या मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध भागामध्ये अडकलेली लोक पुन्हा एकदा आपल्या गावांकडे जात आहेत. परंतु मुंबई, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने या शहरांमधून येणा-या लोकांना गावांमध्ये गावांच्या बाहेर असलेल्या मंदीर अथवा शाळांमध्येच थांबविण्यात येत आहे. गावांकडून स्वयंम क्वारंटाईन सेंटरमध्ये मात्र आरोग्याची कोणत्याही स्वरुपाच्या सोयी नाही, एका ठिकाणी किती लोकांना ठेवायचे, अस्वच्छता, स्वच्छतागृहाची सोय नाही. त्यामुळे सध्या गावांनी तायर केलेली स्वयंम घोषित क्वारंटाईन सेंटर धोक्याची घंटा ठरू शकते.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामgram panchayatग्राम पंचायत