शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नो कन्फ्युजन थेट दिला पुरावा :पी. चिदंबरम यांच्या ट्विटला विमानतळ प्रशासनाचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 20:26 IST

माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी पुणे विमातळावरील पाणी बाटलीच्या किंमतीवरून केलेले ट्विट व्हायरल झाले असून त्याला एअर ऍथॉरिटी ऑफ इंडिया'नेही तात्काळ उत्तर दिले आहे.

पुणे : सोशल मिडीयावर एखादी गोष्ट टाकली की तिची चर्चा होण्यास जास्त काळ लागत नाही. असाच अनुभव पुण्यात आला आहे. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी पुणे विमातळावरील पाणी बाटलीच्या किंमतीवरून केलेले ट्विट व्हायरल झाले असून त्याला एअर ऍथॉरिटी ऑफ इंडिया'नेही तात्काळ उत्तर दिले आहे. नुसते उत्तर नाही तर पुरावा म्हणून थेट फोटो जोडून स्वतःच्या माहितीला ठळक दुजोरा दिला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पी चिदंबरम यांचे शुक्रवारी पुण्यात व्याख्यान होते. त्यावेळी त्यांनी विमान मार्गाने ये-जा केली. या प्रवासादरम्यान त्यांना पुणे विमानतळावर ६० रुपये दराने पिण्याच्या पाण्याची बाटली मिळाली. त्यावर त्यांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी पुणे विमानतळावर 'व्हेंडिंग मशीन बसवले तर किमान २५ रुपयांपर्यंत दर येऊ शकतो' अशी सूचनाही केली. या ट्विटमध्ये त्यांनी एअर ऍथॉरिटी ऑफ इंडिया आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांना टॅग केले. 

त्यांच्या ट्विटची तात्काळ दखल घेत पुणे एअरपोर्ट अकाऊंटवरून  थेट एक फोटोच शेअर करण्यात आला. त्यात पाण्याची बाटली १० रुपये, चहा २० रुपये आणि कॉफी २५ रुपये असे दरपत्रक होते. इतकेच नव्हे तर 'हमारे हवाई अड्डे की इस दुकान पर कॉफी ₹25 की चाय ₹20 की और पानी ₹10 का मिलता है. आपकी सेवा में तत्पर पुणे हवाई अड्डा' अशी ओळही सौजन्यपुर्वक टाकण्यात आली. या ट्विटचे स्क्रीन शॉट्स व्हायरल झाल्याने या ट्विटर प्रश्नोत्तरांची चर्चा सोशल मीडियात रंगली होती.

टॅग्स :pune airportपुणे विमानतळTwitterट्विटरSocial Viralसोशल व्हायरलWaterपाणी