शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार देऊनही कारवाई होत नव्हती; तरुणाने उरुळी कांचन पोलीस स्टेशनवर चढून अंगावर ओतले पेट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:52 IST

पोलिसांनी प्रसंगावधान बाळगून त्याला पकडून छतावरून खाली आणल्याने पुढील दुर्घटना टळली

उरुळी कांचन : पुण्याच्या उरुळी कांचन भागात एका तरूणानं पोलीस ठाण्याच्य छतावर जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी प्रसंगावधान बाळगून त्याला पकडून छतावरून खाली आणले व पुढील दुर्घटना टळली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  या तरुणाने अवैध मटका जुगाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. यावेळी मटका चालकाच्या हे लक्षात येताच त्याने या तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दिनांक १ ) रोजी सोरतापवाडी गावच्या हद्दीतील गॅलेक्सी लॉजच्या पाठीमागे असणाऱ्या एका पत्राच्या शेडमध्ये घडली. त्यांनतर तरुण तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत आला होता. तक्रार दाखल करून २४ तास उलटूनही पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात नव्हता. त्याच्या तक्रारीची दखल घेत नसल्याने तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या छतावर चढून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांच्या  प्रसंगावधानाने त्याला छातीवरून खाली आणले. त्यानंतर पोलिसांनी अवैध धंद्यावर आणि त्या आरोपीवर कारवाई केली. 

आरोपीकडून पत्त्याच्या जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ३ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध मुं.जु.का.क १२ (अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. रविंद्र सुखदेव अवचट (वय ३५, रा. नायगाव, ता. हवेली), विनोद जगन्नाथ लोंढे (वय ३८, रा. नायगाव ता. हवेली), सुनिल भगवान खलसे (वय ३८, रा. कुंजीरवाडी, माळवाडी, ता. हवेली), वसंत दत्तात्रय लोंढे (वय २७ रा. कुंजीरवाडी माळवाडी, ता. हवेली), सर्फराज शहानुर मनीयार (वय ३०, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली), शरद विठ्ठल कर्डे (वय ३२, कुंजीरवाडी, मगरवाडी ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी सुमित वाघ यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेuruli kanchanउरुळी कांचनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक