शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पात अतिक्रमणांवर कारवाई झालीच नाही

By admin | Updated: June 23, 2015 03:23 IST

शहरातील मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात वाहतूक समस्या सोडविण्यासाठी धडक कारवाई करण्याचा निर्धार महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी

पिंपरी : शहरातील मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात वाहतूक समस्या सोडविण्यासाठी धडक कारवाई करण्याचा निर्धार महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी केला होता. चार दिवसांतच धडक मोहिमेची गर्जना पोकळ असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलिसांनी नेहमीप्रमाणे काही वाहनांवर कारवाई करीत ठाणे गाठले. पिंपरी बाजारपेठेत वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी कठोर कारवाईचे धोरण अवलंबण्याचा निर्धार महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी गेल्या बुधवारी (दि. १७) महापालिकेत झालेल्या बैठकीत केला होता. बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, महापालिका आयुक्त राजीव जाधव, उपायुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त महेंद्र रोकडे, बाजारपेठेतील व्यापारी आदी उपस्थित होते. वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करण्यात येणार होती. महापालिका प्रशासन या भागात फिरकले नाही. दिवसभरात एकही अतिक्रमण हटविले नाही. वाहतूक पोलिसांतर्फे नेहमीप्रमाणे कारवाई केली जात होती. त्यात कठोर कारवाईचे धोरण दिसत नव्हते. इंदिरा गांधी उड्डाणपुलावर वाहतूक पोलिसांचे पथक सायंकाळच्या वेळेत उभे होते. विरुद्ध बाजूने पुलावर येणाऱ्या वाहनांना अडवून दंडाची पावती फाडली जात होती. बाजारपेठेत ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई केली गेली. काही चालकांकडून दंडात्मक पावती फाडण्यात आली, तर काही मोटारींना जॅमर लावण्यात आले. तासाभरानंतर ही कारवाई गुंडाळण्यात आली. सायंकाळनंतर खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्यांनी काही रस्ते व्यापले होते. शगुन चौकातील रिक्षा स्टॅण्डवर बेशिस्तपणे रिक्षाचालक उभे होते. त्यांनी रस्त्याचा बराच भाग व्यापला होता. जयहिंद हायस्कूल, एम. यू. महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय, महात्मा फुले महाविद्यालय, आर्य विद्यामंदिर, महापालिका शाळा आदी शाळा भरताना आणि सुटताना वाहतूककोंडीत भर पडत होती. सायंकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांची आणि वाहनांची गर्दी नियंत्रित होत नसल्याने कोंडीत भर पडत होती. (प्रतिनिधी)