शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

नितीन गडकरी म्हणजे धडाडीच्या निर्णयांना मूर्त स्वरूप देणारे नेते; फडणवीसांचं विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 10:32 IST

गडकरी हे सर्वथा योग्य व पात्र आहेत, धडाडीच्या निर्णयांना मूर्त स्वरूप देणारे ते नेते आहेत, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडकरी यांचे कौतुक केले.

पुणे : लोकमान्य टिळक यांच्यासारख्या भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या थोर व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मिळावा यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे सर्वथा योग्य व पात्र आहेत, धडाडीच्या निर्णयांना मूर्त स्वरूप देणारे ते नेते आहेत, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडकरी यांचे कौतुक केले. ‘दादा’ या एकाच शब्दावर पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस व शिंदे, पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये जुगलबंदी झाली. त्यामध्ये ‘दादा’ म्हणूनच परिचित असलेले उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांची गोची झाली. मात्र, कार्यक्रम रंगतदार झाला.

सूत्रसंचालिकेने कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांनाही ‘दादा’ म्हणत असत अशी माहिती देत भाषणासाठी म्हणून अजित पवार यांना बोलावले. त्यांनी, सूत्रसंचालिका पुण्याच्याच आहेत ना? असे म्हणत, आमचे चंद्रकांत दादा काही अजून पुणेकर झालेले नाहीत, अशी मल्लिनाथी केली. त्यावर बसल्या जागेवरूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुम्ही त्यांना पालकमंत्री होऊ दिले नाही, त्यामुळे तसे झाले, असे सांगितले. पवार यांनीही त्यांना लगेचच, मला पालकमंत्री करत असाल तरच तुमच्याकडे येतो असे मी तुम्हाला सांगितले होते, असे प्रत्युत्तर दिले. माझ्या आधी चंद्रकांत ‘दादा’च पालकमंत्री होते याचीही आठवण त्यांनी करून दिली.

गडकरी फक्त यशस्वी राजकारणीच नाहीत तर यशस्वी उद्योजक, यशस्वी शेतकरीही आहेत, असे पवार म्हणाले. ते नेहमीच पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करतात. त्यांचे विकासकामांकडे कायम लक्ष असते. सतत फोन करत असतात. इतर नेत्यांमध्ये दिसतो तसा अहंकार, आक्रस्ताळेपणा त्यांच्यामध्ये औषधालाही नाही. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मातीचा संस्कार असलेला विनय आहे. हा फक्त गडकरी यांचा गौरव नाही तर विनयशील, संवेदनशील, विवेकशील नेतृत्वाचा गौरव आहे असे पवार म्हणाले.उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाची सुरुवातच ‘चंद्रकांत दादांना कोल्हापूरला पाठवणार आहात की काय? अशी केली. सभागृहात त्यामुळे हास्यकल्लोळ झाला. सच्चा आणि दिलदार नेता अशा शब्दांमध्ये गडकरी यांचा गौरव करत शिंदे म्हणाले, गडकरी रोडकरी, पुलकरी व आता कोर्ट बांधतात तर कोर्टकरी आहेत. महायुतीचे ते मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शकही आहेत. ठाण्यातून येत होतो तिथे एका चौकात नितीन जंक्शन आहे. तिथला रस्ताही गडकरी यांनीच बांधला आहे. विकासाचा महामेरू असे त्यांना म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांनाही त्यांच्या भाषणाची सुरुवात ‘दादा’ शब्दानेच केली. जे कधीही ‘दादागिरी’ करत नाहीत ते ‘दादा’ असे त्यांनी चंद्रकात पाटील यांच्याकडे पाहून म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. त्याचबरोबर, काहींचे व्यक्तिमत्त्वच असते की त्यांनी नुसते पाहिले तरी दादागिरी वाटते, अशी पुस्ती त्यांनी अजित पवार यांच्याकडे पाहून जोडली. जो बाणा टिळकांचा होता तोच गडकरींचा आहे असा गौरव करून फडणवीस म्हणाले, काही वर्षांपूर्वी पायाभूत सुविधा पाहायला आपले लोक जगात जात होते, आता जगातील लोक आपल्याकडे येतात. ते नेहमीच आजच्यापेक्षा २० वर्षे पुढचे पाहतात. देशातील स्थापत्य कामांचा गुणात्मक वेग त्यांनी वाढवला. इथेनॉलवर गाड्या चालतील हे त्यांनी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळी त्यांना सांगितले होते. अटलजींनी त्यांना त्याच वेळी याचे धोरण तयार करायला सांगितले. त्यासाठी ते ब्राझीलला जाऊन आले. या पुरस्कारासाठी ते सर्वाधिक पात्र व्यक्ती आहेत.

लोकमान्य हा जीवनभराचा प्रेरणास्रोत : नितीन गडकरीपुरस्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना नितीन गडकरी यांनी आपल्या मनात आनंद व संकोच अशा दोन्ही भावना असल्याचे सांगितले. लोकमान्य हा जीवनभराचा प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळतो आहे याचा आनंदच आहे. याने आता जबाबदारी वाढली आहे. सर्वांची भाषणे ऐकल्यानंतर त्यांनी केलेले गुणवर्णन ऐकून संकोचही वाटत आहे असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच त्यांना आलेल्या चिठ्ठीचा संदर्भ देत ते म्हणाले, सुरत, गुवाहाटी इथले रस्ते गडकरी यांनी बांधले म्हणून तिकडे गेले का असे या चिठ्ठीत विचारले आहे. गडकरी यांनी त्यावर बसल्या जागेवरूनच तुमच्या हॉटेलसमोरचा रस्ता आम्हीच बांधला आहे असे सांगितल्यावर सभागृहात हशा पिकला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरी