शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पुरुषोत्तम करंडकच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर, अंतिम स्पर्धेसाठी ९ संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 23:29 IST

प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५८ व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निकालाची आज घोषणा करण्यात आली. त्यामध्ये, अंतिम फेरीसाठी ९ संघांची निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. १६ ते ३० ऑगस्ट या कालावधीत झाली. एकूण ५१ संघांनी सादरीकरण केले. अंतिम फेरी दि. ९ व १० सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिरात होणार आहे. प्राथमिक फेरीच्या स्पर्धेचे परिक्षण प्राथमिक फेरीचे परिक्षक गिरीश केमकर, मिलिंद कुलकर्णी, शेखर नाईक यांनी केले.

अंतिम स्पर्धेत पोहोचलेले ९ संघ : 

महाविद्यालयाचे नाव आणि कंसात एकांकिकेचे नाव

अप्पासाहेब जेधे महाविद्यालय (पाईक), झील अभियांत्रिकी महाविद्यालय (परत फिरारे), आयएमसीसी महाविद्यायल, (मायबाब..!?), मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय (रवायत ए विरासत) मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेल सेफ), स. प. महाविद्यालय (कृष्णपक्ष), विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, बारामती (पाऊस पाड्या), राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे (पंक्चर पोहे), टिळक आयुर्वेद महाविद्यालय (पिक्सल्स).

अभिनय उत्तेजनार्थ १० संघ : 

(कलाकाराचे नाव, कंसात भूमिका, एकांकिकांचे नाव आणि महाविद्यालय) सानिका आपटे (रमा, त्रिजा, फर्ग्युसन महाविद्यालय, स्वायत्त), पूर्वा हारुगडे (संगिता, आरं संसार संसार, आयएलएस विधी महाविद्यालय), शंतनू गायकवाड (दश्श्यू, राखणदार, मॉडर्न कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर), गार्गी माईणकर (साथीदार/आजी, स्त्रीसुक्त - अर्थात काळ्या बाळीची कथा, म. ए. सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌), तृप्ती जाधव (लक्ष्मी, पिंपळपान, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती), मैत्रेयी वडगे (राधा, मांदिआळी, श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय), अंतरा वाडेकर (प्रिया, तोरण, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर), समृद्धी शेट्टी (ती, फोबिया, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी), विवेक पगारे (मधुकर देशपांडे, अमृतफळे, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), स्वरा कळस (मिनी, एजंट वन, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे).

उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक : श्रेयस जोशी (सिनेमा, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय). 

उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शक : आर्या देवरे (पूर्णविराम, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय). 

दर्जा खालावलेले संघ :

सेकंडह्यांड (डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ताथवडे), अवचित (जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ नऱ्हे, टेक्निकल कॅम्पस), रहस्यचक्र (इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट, परंदवाडी), इ.एल.आय.एस.एच.ए.आर. (सिंहगड ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, कोंढवा), अंक पहिला (एआयएसएसएमएसआयओआयटी), 3 टक्के (पीडीईए अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी), बाय हुक ऑर बाय क्रुक (श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय), तेरे मेरे सपने (ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय), या सुखांनो या (भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय, नऱ्हे), ईटाळ (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे).

टॅग्स :Puneपुणे