शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चाकणमध्ये मराठा आंदोलनादरम्यान पीएमपीच्या नऊ बस जाळल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 21:45 IST

चाकणमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी बंद पाळण्यात आला. मात्र, या बंदला हिंसक वळण लागल्याने वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. त्याचा सर्वाधिक फटका पीएमपीला बसला आहे.

ठळक मुद्देआंदोलन चिघळल्याने दुपारी बारा वाजल्यानंतर या मार्गावरील संचलन पूर्णपणे बंद पीएमपीच्या ताफ्यात आधीच बसेसची संख्या कमीआंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी चाकण व परिसरात बस संचलन सुरू ठेवण्याबाबत परिस्थितीनुसार निर्णय

पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणमध्ये झालेल्या मराठा आंदोलनादरम्यान सोमवारी (दि. ३०) पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या नऊ बस जाळण्यात आल्या आहेत. तर चार बसेसची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे दुपारनंतर चाकण व राजगुरूनगरला जाणाऱ्या बसेसच्या सर्व फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. चाकणमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी बंद पाळण्यात आला. मात्र, या बंदला हिंसक वळण लागल्याने वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. त्याचा सर्वाधिक फटका पीएमपीला बसला आहे. चाकण, राजगुरूनगर या भागात पीएमपीकडून दररोज अनेक फेऱ्या केल्या जातात. हे मार्ग पीएमपीसाठी फायदेशीर ठरतात. प्रवाशांकडूनही या मार्गांवर पीएमपीला पसंती दिली जाते. मात्र, सोमवारच्या आंदोलनामुळे पीएमपीला मोठा आर्थिक फटका बसला. भोसरी, पिंपरी, पुणे स्टेशन, पीएमपी, मनपा यांसह अन्य काही आगारांमधून चाकणलला बस सोडल्या जातात. त्यानुसार सकाळच्या सत्रात नियमितपणे बस सोडण्यात आल्या. मात्र, आंदोलन चिघळल्याने दुपारी बारा वाजल्यानंतर या मार्गावरील संचलन पूर्णपणे बंद करण्यात आले. पीएमपीचे महाव्यवस्थापक विलास बांदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमध्ये आंदोलनादरम्यान पीएमपीच्या एकुण १३ बसेसला फटका बसला आहे. त्यापैकी ९ बस जाळण्यात आल्या असून उर्वरीत चार बससेची तोडफोड करण्यात आली. नऊ बसेसपैकी सात बस पीएमपीच्या मालकीच्या तर दोन बस भाडेतत्वावरील आहेत. या सर्व बस भोसरी आगाराच्या आहेत. या आगारातील एक बस फोडण्यात आली आहे. तर पिंपरी व हडपसर आगारातील अनुक्रमे २ व १ बसची तोडफोड करण्यात आली. सुदैवाने यामध्ये बसचे चालक व वाहक यांच्यासह प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नाही. आंदोलकांकडून प्रवाशांना खाली उतरवून बस पेटविण्यात आल्या. या घटनांमुळे दिवसभरातील सर्व फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. केवळ भोसरीपर्यंतच संचलन सुरू ठेवण्यात आले.दरम्यान, बस जाळण्यात आल्याने पीएमपीला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात आधीच बसेसची संख्या कमी आहे. त्यातच बसेस जाळणे, तोडफोडीच्या घटना घडल्याने संचलनावर परिणाम होणार आहे. सोमवारच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी चाकण व परिसरात बस संचलन सुरू ठेवण्याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाChakanचाकण