निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका! मिळकत कर थकवल्याने हॉटेल केले सील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 02:00 PM2024-02-28T14:00:01+5:302024-02-28T14:07:41+5:30

राजकीय नेत्यांवरही पुणे महापालिकेने  धडक कारवाई सुरू केली आहे....

Nilesh Rane Pune Municipal Corporation! The hotel was sealed due to failure of income tax | निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका! मिळकत कर थकवल्याने हॉटेल केले सील

निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका! मिळकत कर थकवल्याने हॉटेल केले सील

पुणे : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि माजी खासदार निलेश राणेंना पुणे महापालिकेने दणका दिला आहे. निलेश राणेंची पुण्यातील तीन कोटी ७७ लाख रुपयांची मिळकतकराची थकबाकी होती. त्यामुळे डेक्कन परिसरात असणारे त्यांचे हॉटेल मंगळवारी (ता. २७) पुणे महापालिकेने सील केले. राजकीय नेत्यांवरही पुणे महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून थकबाकीची वसुली केली जात आहे. पाच पथकांद्वारे पुणे शहराच्या विविध भागात थकबाकी न भरणाऱ्या व्यावसायिक मिळकती सील केल्या जात आहेत. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बँड वाजवून थकबाकी वसूल केली जात आहे.

शिवाजीनगर विभागाच्या हद्दीत डेक्कन कॉर्नर येथे एक मॉल आहे. या मॉलची एकूण पाच कोटी ६० लाख रुपये थकबाकी होती, त्यापैकी एक कोटी ४० लाख रुपये एका मजल्याची थकबाकी संबंधितांनी भरली. त्यानंतर वरच्या दोन मजल्यांची तीन कोटी ७७ कोटी थकबाकी भरावी यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. पण संबंधितांकडून त्यास दाद दिली नव्हती. त्यामुळे मंगळवारी महापालिकेच्या पथकाने ही मिळकत सील केली आहे.

मागील काही दिवसांपासून पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून थकबाकीची वसुली केली जात आहे. पाच पथकांद्वारे पुणे शहराच्या विविध भागात थकबाकी न भरणाऱ्या व्यावसायिक मिळकती सील केल्या जात आहेत. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बँड वाजवून थकबाकी वसूल केली जात आहे. शिवाजीनगर विभागाच्या हद्दीत डेक्कन कॉर्नर येथे एक मॉल आहे. या मॉलची एकूण पाच कोटी ६० लाख रुपये थकबाकी होती, त्यापैकी एक कोटी ४० लाख रुपये एका मजल्याची थकबाकी संबंधितांनी भरली. त्यानंतर वरच्या दोन मजल्यांची तीन कोटी ७७ कोटी थकबाकी भरावी यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. पण संबंधितांकडून त्यास दाद दिली नव्हती. त्यामुळे मंगळवारी महापालिकेच्या पथकाने ही मिळकत सील केली आहे.

- माधव जगताप (उपायुक्त, मिळकतकर, विभाग)

Web Title: Nilesh Rane Pune Municipal Corporation! The hotel was sealed due to failure of income tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.