शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

निलेश राणे तुम्ही एकदा बारामतीला या! अजित पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचं जोरदार प्रत्युत्तर 

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 21, 2020 17:03 IST

राष्ट्रवादीकडून निलेश राणे यांना बारामती भेटीचे 'ठरवून' आमंत्रण

पुणे : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून राणे पिता-पुत्र हे महाविकास आघाडीतील शिवसेनेसह, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर निशाणा साधत आहे. विविध मुद्यांवरून आघाडीतील नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी राणे कुटुंब सोडत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते व माजी खासदार असलेले निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता या टीकेला थेट बारामतीतून प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांना बारामती भेटीचे 'ठरवून' आमंत्रण दिले आहे.  

भाजपनेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी शब्दात टीका केली होती. ते म्हणाले होते, अजित पवार यांना आज जो काही मान आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद यांच्यामुळेच आहे. बारामतीत आजदेखील शरद पवार यांचीच पूर्णपणे ताकद असल्याचे दिसते. तसे अजित पवारांचे काहीही ताकद बारामतीत नाही. ते स्वबळावर ग्रामपंचायतीचा सदस्य देखील निवडून आणू शकत नाही. 

बारामती शहर युवक काँग्रेसने निलेश राणे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देतानाच अजित पवारांनी केलेली विकासकामे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य पाहायला बारामतीत जरूर या असे थेट आव्हानच दिले आहे. या आमंत्रणाला राणे नेमके काय प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

बारामतीत शरद पवार यांनी पूर्णपणे स्वतःची वेगळी ओळख व ताकद निर्माण केली आहे.बारामतीतील बारीक सारीक गोष्टींची देखील ते तपशीलवार माहिती ठेवतात. बर्मातीवर त्यांची करडी नजर असते. आजदेखील त्यांनी आपली ताकद जराही कमी होऊ दिलेली नाही.तसे अजित पवारांच्या बाबतीत म्हणता येणार नाही. बारामतीत त्यांची स्वतःची अशी काहीही ताकद नाही. या शब्दात निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. 

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर मासाळ म्हणाले की, देशाचे पंतप्रधान मोदी व तुमचे भाऊ नितेश राणे यांनी देखील वारंवार बारामतीच्या विकास कामांचे तोंडभरून कौतुक केले आहे. आधी बारामतीतील विकास कामांची त्यांच्याकडून माहिती घ्या आणि नंतर बरळत चला अशा खरमरीत शब्दांत हल्लाबोल केला आहे. 

अजित पवारांनी मोठमोठ्या बाता करु नये....अजित पवार यांनी बारामतीत काहीही केलेले नाही. तसेच त्यांच्या स्वतःच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. ते स्वबळावर ग्रामपंचायतीचा सदस्य देखील निवडून आणू शकत नाही. म्हणून मी निवडून आणतो असे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. ते कुणाच्या विजयाचे श्रेय घेऊ शकत नाही. तसेच निष्कारण अजित पवारांनी मोठमोठ्या बाता करु नये.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीNilesh Raneनिलेश राणे Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार