जुना मुंबई-पुणे महामार्गावर रात्रीचा प्रवास जोखमीचा,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:49 IST2017-09-11T02:44:47+5:302017-09-11T02:49:13+5:30
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पवनानगर फाटा येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करतेवेळी महामार्गावरील रस्ता दुभाजकावरील हिरव्या रंगाचे रिफ्लेक्टर काढल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनचालकांसह दुचाकीस्वारांना समोरील रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

जुना मुंबई-पुणे महामार्गावर रात्रीचा प्रवास जोखमीचा,
कामशेत : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पवनानगर फाटा येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करतेवेळी महामार्गावरील रस्ता दुभाजकावरील हिरव्या रंगाचे रिफ्लेक्टर काढल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनचालकांसह दुचाकीस्वारांना समोरील रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पवना फाट्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी महामार्गावरील कामशेत ते वडगावपर्यंत ठिकठिकाणी दुभाजकावरील रिफ्लेक्टर काढले गेले. ते अद्यापही बसवण्यात आले नाहीत. रिफ्लेक्टर काढल्याने रात्रीच्या वेळी चारचाकी व मोठ्या गाड्यांच्या वाहनचालकांना दुसºया लेनवरील वाहनांच्या प्रखर लाइटमुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. रिफ्लेक्टर नसल्याने मोठ्या वाहनचालकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
शिवाय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साइड पट्ट्यांची पावसामुळे मोठी दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी साइड पट्ट्यांवरून अवजड वाहने जाऊन त्या खचल्या आहेत. रात्रीच्या वेळी त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालूनच वाहन चालवावे लागत आहे.
रात्रीच्या वेळी महामार्गावरून जाताना एखाद्या अवजड वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास रस्त्यावर दुभाजक नसल्याने ते वाहन दुसºया लेनवर आल्यास मोठा अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे या रस्त्यावरून रात्रीचा प्रवास जोखमीचा झाला आहे. या रस्त्यावरील दुभाजक रिफ्लेक्टर बसवण्यासह साइड पट्ट्या दुरुस्तीचे काम करण्याची मागणी होत आहे.
सेवारस्त्यावरही अंधारच...
महामार्गाच्या कामशेत हद्दीतील सेवा रस्ता व महामार्ग या मधोमध असणाºया महामार्गाच्या गटारांवरील सिमेंट ब्लॉकची झाकणे अत्यंत दुरवस्थेत असून, अनेक ठिकाणी तर गटारांवर झाकणेच नसल्याने पलीकडे असणाºया वसाहतीतील नागरिकांना महामार्ग ओलांडताना धोका निर्माण होतो. तसेच बहुतेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटली असून, ती महामार्गाच्या सेवारस्त्यावर आल्याने अंधारात दुचाकीचालक या झाकणांना धडकून अपघात होण्याची शक्यता आहे.