शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु करायला लागणार आणखी ३ महिने: आरोग्यमंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 19:47 IST

मुंबई, पुणे , नागपूर सारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

पुणे:  राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची जोरदार मोहीम सुरू आहे. रोज सरासरी ३ लाख लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत जवळपास  ४५ लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र,आत्ता सुरु असलेला ४५ वर्षां पुढच्या आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण होण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.

दरम्यान, सरसकट लसीकरणाची मागणी असली तरी केंद्राच्या धोरणाप्रमाणेच आम्ही अंमलबजावणी करत आहोत असेही यावेळी टोपे म्हणाले. 

पुण्यात राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीवर भाष्य केले. टोपे म्हणाले,आजमितीला राज्यात २ लाख १० हजार सक्रिय रुग्ण असून त्यापैकी ८५ टक्के लक्षण विरहित आहे. ०.४ टक्के मृत्युदर आहे. आजमितीला पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे.

मुंबई, पुणे , नागपूर सारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. कोविशिल्ड लसीकरणा दरम्यानच्या दोन डोसांमध्ये ४५ ते ६० दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. 

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीची टक्केवारी कमी....

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे. आपली ८० टक्के असेल तर इतर ठिकाणी २०० टक्के आहे.खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी ८० टक्के खाटा ठेवण्यात येतील. तसेच डॅशबोर्ड नियमितपणे अपडेट केला जाईल. याचवेळी रुग्णांना वेळेत उपचार मिळेल याला प्राधान्य देणार असल्याचे देखील 

-  राजेश टोपे, आरोग्यमंत्री

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार