सार्वजनिक स्वच्छतागृहात नवजात अर्भक सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST2021-09-07T04:15:20+5:302021-09-07T04:15:20+5:30
नसरापूर (ता. भोर) येथील मुख्य रस्त्यावरील व गर्दीच्या महिला सार्वजनिक स्वच्छतागृहात नवजात पुरुष जातीचे अर्भक सोमवारी ४ च्या ...

सार्वजनिक स्वच्छतागृहात नवजात अर्भक सापडले
नसरापूर (ता. भोर) येथील मुख्य रस्त्यावरील व गर्दीच्या महिला सार्वजनिक स्वच्छतागृहात नवजात पुरुष जातीचे अर्भक सोमवारी ४ च्या दरम्यान सापडले. अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेले हे अर्भक असून त्याची नाळदेखील तशीच असल्याचे दिसून आले. घटनेची खबर मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी पोचले. राजगड पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेतले. त्याला नसरापूर येथील प्राथमिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीस मुलाच्या आईवडिलांचा शोध घेत आहेत. घटनेचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही तपासणार आहेत.
सोबत : नवजात अर्भकाचा फोटो
060921\1919-img-20210906-wa0024.jpg
सोबत : नवजात अर्भकाचा फोटो