शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पुण्यात कचऱ्यात सापडले नवजात अर्भक, सिंहगड रस्ता परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 10:56 IST

याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेऊन ससूनला पाठविले आहे....

धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील लाडली साडी सेंटर या दुकानापुढे मुख्य रस्त्यावर कचऱ्यात पुरुष जातीचे एक नवजात अर्भक मृत अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेऊन ससूनला पाठविले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका कचरावेचकला कचऱ्यात हे नवजात अर्भक दिसून आले. त्यांनी लागलीच याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पाहिले असता, ते नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी ते अर्भक ससून रुग्णालयात पाठविले असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून हे बाळ कोणाचं आहे आणि असे कोण निर्दयी आई-बाबा आहे ज्यांनी पोटच्या गोळ्याला असं फेकून दिलं याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, घटनेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस स्थानिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. तर हे अर्भक कचराकुंडीत कोणी फेकलं हे शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासणार आहेत. पण पोटच्या बाळाला अशा प्रकारे फेकल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नाराजी पसरली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीस