शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

नववर्षाचे हॉटेलमधील सेलिब्रेशन रात्री पावणे अकरापर्यंतच; पुणे महापालिकेची 'ही' आहे नियमावली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 20:01 IST

महापालिकेने दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार..

ठळक मुद्देपुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी जारी केले आदेश

पुणे : पुणे महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार यांना ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणेअकरापर्यंतच परवानगी दिली आहे. कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून, कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये असेही पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यामुळे यंदाचे नववर्षाचे हॉटेलमधील सेलिब्रेशन विना डीजे व रात्री पावणेअकरापर्यंतच करावे लागणार आहे. 

महापालिकेने दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना तथा व्यक्तीवर ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने सांगितले आहे.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश बुधवारी जारी केले आहेत. यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे असे सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी महापालिका हदद्ीतील उद्याने, मोकळी मैदाने, पर्यटनस्थळे तसेच रस्त्यावंर अशा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये़ तसेच गर्दी आकर्षित होईल असे कोणतेही कार्यक्रम, मिरवणुका कोणीही आयोजित करू नये, फटाक्यांची आतिषबाजी करू नये असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणेअकरापर्यंतच हॉटेलला परवानगी देताना महापालिकेने होम डिलेवरी सुविधा देखील याचवेळी बंद करावी असे सांगितले आहे.    नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जातात या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळावर सोशल डिस्टन्सींगचे पालन होईल याची खबरदारी घेऊन, आरोग्य व स्वच्छतेच्यादृष्टीने योग्य त्या खबरदाºया घेण्यात याव्यात.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhotelहॉटेलPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या