शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात विद्यार्थ्यांना छापील स्वरूपातील पाठ्यपुस्तके देणार; बालभारतीकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 06:15 IST

बालभारतीकडून स्पष्टीकरण : जूनपर्यंत पुस्तक छपाई पूर्ण करणार

पुणे : कोरोनामुळे मागील वर्षीच बालभारतीने पहिली ते बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके ऑनलाईन पद्धतीने मोफत उपलब्ध करून दिली आहेत. तसेच जून‌ महिन्यापर्यंत पुस्तक छपाईचे काम पूर्ण करून विद्यार्थ्यांना छापील स्वरूपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्याचा बालभारतीचा प्रयत्न आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुटीनंतरच विद्यार्थ्यांच्या हातात कोरी करकरीत पुस्तके मिळणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते नववी व अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला. परंतु, अद्याप विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला नाही. मात्र, परीक्षा न देता विद्यार्थी पुढील वर्गात गेले आहेत. त्यामुळे आता आपल्या पाल्याने पुढील वर्गाचा अभ्यासक्रम सुरू करावा, अशा पालकांच्या अपेक्षा आहेत. सीबीएसई बोर्डाचे शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे सध्या या शाळा सुरू आहेत. परंतु, एसएससी, एचएससी बोर्डाच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू होते. या दृष्टीनेच बालभारतीतर्फे पुस्तक छपाईचे नियोजन केले आहे. 

एसटीला पुस्तक वाहतुकीचे कंत्राटअमरावती आणि नागपूर बोर्डाच्या बालभारती साहित्य पुरवठ्याचे वाहतुकीचे काम एसटीच्या नागपूर विभागाला मिळाले आहे. दोन वर्षांचे हे कंत्राट मिळाले असल्याने एसटीला आर्थिक पाठबळ लाभले आहे.

 मागील वर्षी छपाई केलेली अनेक पुस्तके कोरोनामुळे शिल्लक आहेत. तसेच काही पुस्तकांची छपाई नुकतीच केली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे सध्या छपाई बंद आहे. परंतु, पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये सर्व पुस्तकांची छपाई पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या हातात छापील पुस्तके दिली जातील.- दिनकर पाटील, संचालक, बालभारती 

टॅग्स :Educationशिक्षणPuneपुणे