शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नव्या गाड्या, नवीन थांबा सुरु करा; सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करा, समिती सदस्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:52 IST

रेल्वेचे सुरक्षित आणि वेळेवर संचलन, रेल्वे रुळांची योग्य देखभाल, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे आदींसाठी योग्य पावले उचलली जात आहेत

पुणे: नवीन रेल्वेगाडी सुरू करणे, नवीन थांबा सुरू करणे, सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार अशा विविध मागण्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी केल्या. त्यावेळी पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी मागण्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच, रेल्वेचे सुरक्षित आणि वेळेवर संचलन, रेल्वे रुळांची योग्य देखभाल, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे आदींसाठी योग्य पावले उचलली जात आहे. प्रवासी सुविधा चांगल्या देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीची पहिली बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीचे समन्वय वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक रामदास भिसे उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित सदस्यांनी प्रवाशांच्या सुविधा आणि समस्यांबाबत सूचना दिल्या. रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली. वर्मा यांनी समस्यांवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी नंदकुमार पाटील, राहुल मुथा, विनीत पाटील, ऋतुराज काळे, राम जोगदंड, राज कुमार नहार, रणजित श्रोगोड, गोरख बारहाटे आणि रफिक खान आदी उपस्थित होते. या बैठकीत शिवनाथ बियाणी यांची प्रादेशिक रेल्वे सल्लागार समिती (झेडआरयूसीसी) सदस्य म्हणून एकमताने निवड करण्यात आली. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बेहरा यांनी आभार मानले.

या मागण्या

-पुणे ते साईगर शिर्डी, साईनगर शिर्डी ते पंढरपूर, मनमाड ते पुणे अशी नवीन गाडी सुरू करणे.- बेलापूर स्थानकावर हॉलिडे स्पेशलचा थांबा.- सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करावा.- राहुरी येथे नवीन गाडी सुरू करणे.-पुणे-अमरावती आणि दादर-शिर्डी दादर रेल्वे स्थानकावर थांबा, बेलापूर स्थानकाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानक असे नामकरण, बेलापूर मालगाडीचे शेड स्थलांतर, कोल्हापूर/बेळगाव ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस धावणे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीpune railway stationपुणे रेल्वे स्थानकticketतिकिटSocialसामाजिक