पदपथ, पार्किंगसाठी पालिकेचे नवे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 02:49 IST2016-01-16T02:49:03+5:302016-01-16T02:49:03+5:30

पदपथावर चालणाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेणारे तसेच वाहनांचा वाढता वापर रोखण्यासाठी उपयुक्त ठरावे, अशी अपेक्षा असलेले नवे वाहनतळ धोरण महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी

New policy for footpath, parking | पदपथ, पार्किंगसाठी पालिकेचे नवे धोरण

पदपथ, पार्किंगसाठी पालिकेचे नवे धोरण

पुणे : पदपथावर चालणाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेणारे तसेच वाहनांचा वाढता वापर रोखण्यासाठी उपयुक्त ठरावे, अशी अपेक्षा असलेले नवे वाहनतळ धोरण महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज जाहीर केले. यात विनामूल्य वाहनतळ ही संकल्पना मोडीत काढण्यात आली आहे, तर पदपथांवर व्यवसाय वगैरे करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी हे धोरण येते १५ दिवस खुले असेल. महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच मुख्य कार्यालयात ते उपलब्ध होईल. नागरिकांनी त्यावर आपल्या सूचना द्याव्यात, त्या सर्व सूचनांचा विचार करून नंतर हे धोरण पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. शहराचा वाढता विस्तार, वाहनांची प्रचंड वाढलेली व वाढतच असलेली संख्या या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भविष्यातील पुणे सुरक्षित, सुंदर करण्यासाठी असे धोरण करण्याची गरज होती. त्यादृष्टीने महापालिकेने हे पाऊल टाकल्याचे आयुक्त म्हणाले.
वाहन लावण्यासाठी जागा मिळणे हा आपला हक्कच आहे, असे प्रत्येक वाहनधारकाला वाटते. हा समज चुकीचा आहे, हे त्या शहरांनी आता मान्य केले असून, त्यांचा प्रवास उलट दिशेने म्हणजे वाहनतळांची संख्या कमी करणे, वाहन लावण्यासाठी जास्त पैसे आकारणे असा सुरू झाला. त्यांना अपेक्षित परिणाम मिळाला. येणाऱ्या वाहनांच्या संख्येतच कपात झाली असे नाही तर वाहने घेणाऱ्यांची संख्याही कमी झाली. नव्या धोरणातही याचीच अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.

असे आहे वाहनतळ धोरण
वाहनतळ धोरणात अनेक मुद्द्यांचा विचार करण्यात आला असून, रस्ते हे रहदारीसाठी आहेत, वाहनतळासाठी नाहीत, हा या धोरणाचा केंद्रबिंदू आहे. नागरिकांना खासगी वाहनाच्या वापरापासून परावृत्त करणे, हा धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यातील काही तरतुदी याप्रमाणे :
-वाहनतळासाठीचे दर वाढवणे, त्यात रुग्णालये किंवा तत्सम गोष्टींसाठीच्या वाहनांना सवलत असेल.
-रस्त्यावरील वाहनतळांच्या संख्येत कपात करणे
-वाहनतळांच्या जागांमध्ये सुसूत्रता आणणे
-वाहतळातून जमा होणारा निधी सार्वजनिक वाहतूक सुधारणा व पादचारी सुरक्षा यासाठीच वापरणे
-वाहनतळावर वाहन लावण्याच्या वेळेवर दरनिश्चिती ठरवून नियंत्रण करणे

असे आहे पदपथ धोरण
-पदपथावर चालणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षा मिळेल याची काळजी घेणे
-रस्त्यांची रचना पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी असेल
-शहरात अनेक ठिकाणी पादचारी क्षेत्र निर्माण करणे
-सर्व रस्त्यांवर चालण्यासाठीच म्हणून एक निर्देशित मार्ग तयार करणे
-रस्ता ओलांडण्यासाठी नियम तयार करणे

Web Title: New policy for footpath, parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.