लोकमत इम्पॅक्ट मेखळीत नवीन खांब बसवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:12 IST2021-08-26T04:12:27+5:302021-08-26T04:12:27+5:30

मेखळी :बारामती तालुक्यातील मेखळीतील भोसलेवस्ती येथील विजेच्या खाली आलेल्या तारांसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महावितरणने तत्काळ दुरुस्ती केली. भोसलेवस्ती ...

A new pillar was erected in the Lokmat Impact belt | लोकमत इम्पॅक्ट मेखळीत नवीन खांब बसवला

लोकमत इम्पॅक्ट मेखळीत नवीन खांब बसवला

मेखळी :बारामती तालुक्यातील मेखळीतील भोसलेवस्ती येथील विजेच्या खाली आलेल्या तारांसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महावितरणने तत्काळ दुरुस्ती केली.

भोसलेवस्ती येथे मागील वर्षभरापासून विजेचा खांब अर्ध्यातून मोडल्यामुळे विजेच्या तारा हाताच्या अंतरावर आल्या होत्या. वारंवार तक्रार करूनदेखील हे काम झाले नाही. खाली आलेल्या तारांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. सध्या पावसाळा सुरू असून या दिवसात मोडलेला खांब व तारा खाली पडून जीवितहानी होण्याची शक्यता होती. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने शनिवार (दि.२१ ) रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मंगळवार (दि.२४ ) रोजी तारांची व खांबाची दुरुस्ती करून नवीन खांब बसवला. त्यामुळे पावसाळ्यात होणारा संभाव्य धोका टळला असून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मेखळी भोसलेवस्ती येथील विजेच्या खाली आलेल्या तारांची दुरुस्ती करताना महावितरणचे कर्मचारी.

२५०८२०२१-बारामती-०८

फोटो ओळी : शनिवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त

२५०८२०२१-बारामती-०९

Web Title: A new pillar was erected in the Lokmat Impact belt