शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

रिलॅक्स व्हायचंय ? मग पुण्यातल्या या अाॅक्सिजन बारला भेट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:03 IST

धकाधकीच्या अायुष्यातून थाेडावेळ रिलॅक्स हाेण्यासाठी, तसेच ताण-तणावातून मुक्तता मिळविण्यासाठी पुण्यात देशातील पहिलाच हेल्थ बार अर्थात अाॅक्सिजन बार सुरु करण्यात अाला अाहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांना याचा फायदा हाेत अाहे.

ठळक मुद्देएकावेळी 6 नागरिकांना घेता येते थेरपीअाॅक्सिजन साेबत संगीत व अाराेग्यासाठी उत्तम सॅलडही देण्यात येते.

पुणे : अाजच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव वाढताेय. त्याचबराेबर वाढत्या प्रदुषणामुळे शुद्ध हवा अाणि पुरेसा अाॅक्सिजन मिळणे कठीण झाले अाहे. मात्र पुणेकरांना अाता शुद्ध हवा अाणि शुद्ध अाॅक्सिजन मिळणे शक्य हाेणार अाहे. पुण्यात अनाेखा अाॅक्सिजन बार सुरु झाला असून यानिमित्ताने नागरिकांना अापल्या ताण-तणावातून मुक्तता मिळवता येणे शक्य हाेणार अाहे. 

    नागरिकांना चांगले अाराेग्य मिळावं, शुद्ध अाॅक्सिजन घेता यावा याहेतूने तुषार खाेमने यांनी पुण्यातील लाॅ काॅलेज रस्त्याला एक हेल्थ सेंटर सुरु केले. या हेल्थ सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध अाॅक्सिजनचा पुरवठा केला जाताे. त्याचबराेबर डाेकं शांत करण्यासाठी संगीत थेरपीसुद्धा दिली जाते. दहा,वीस अाणि तीस मिनिटे अश्या सेशन्समध्ये ही थेरपी घेता येते. यात नागरिकांच्या पसंतीचे फ्लेवर्ससुद्धा अॅड केले जातात. या ठिकाणची थेरपी घेतल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं. दिवसभराचा थकवा एका क्षणात दूर हाेताे. दमा असलेल्या तसेच जीम करणाऱ्यांना हि थेरपी उपयुक्त अाहे. मन प्रफुल्लीत राहण्यासाठी, एकाग्रतेसाठी अाॅक्सिजनची गरज असते. परंतु सध्याच्या प्रदुषण अाणि जीवनशैलीमुळे नागरिकांना पुरेसा शुद्ध अाॅक्सिजन मिळत नाही. त्यामुळे अनेक विकारांना सामाेरे जावे लागते. यावर अाता हा अाॅक्सिजन बार एक चांगला पर्याय म्हणून समाेर येत अाहे.      तुषार खाेमने म्हणाले, नागरिकांना चांगले अाराेग्य मिळावे या हेतूने हे हेल्थ सेंटर सुरु केले. नागरिकांचा चांगला प्रतिसाद याला मिळत अाहे. अाजच्या धकाधकीच्या जीवनात अापल्याला पुरेसा शुद्ध अाॅक्सिजन मिळत नाही. या अाॅक्सिजन बारमधील थेरपी घेतल्यानंतर नागरिकांना रिलॅक्स वाटते अाणि ताण-तणावातून मुक्तता मिळते. यानिमित्ताने तरुणांना राेजगाराचा एक नवीन पर्यायही समाेर अाला अाहे. शहरातील पाैड राेड व एअरपाेर्टजवळही असे हेल्थ सेंटर सुरु करण्याचा अामचा मानस अाहे. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यpollutionप्रदूषण