नुतन सदस्यांनी स्वच्छतेपासून कामकाजास केली सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:04+5:302021-02-05T05:11:04+5:30

इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता पाच वर्षांपासून होती. तत्कालीन निवडून आलेल्या पदाधिकारी यांनी निवडून येताच हातात ...

The new members started working from cleanliness | नुतन सदस्यांनी स्वच्छतेपासून कामकाजास केली सुरुवात

नुतन सदस्यांनी स्वच्छतेपासून कामकाजास केली सुरुवात

इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता पाच वर्षांपासून होती. तत्कालीन निवडून आलेल्या पदाधिकारी यांनी निवडून येताच हातात झाडू घेत भिगवण गाव कच-या पासून मुक्त करण्यासाठी चंग बांधला होता.मात्र काही काळात पदाच्या अपेक्षेमुळे ऐकीत बेकी होत चांगल्या आणि महत्वाकांक्षा असणाऱ्या कामांना ब्रेक लागला. राष्ट्रवादी पक्षाला खो देत विरोधकांनी एकत्र येत भिगवणची सत्ता पुन्हा मिळविण्यात यश मिळविले. दिवंगत नेते रमेश जाधव यांच्या प्रेरणेतून उभ्या केलेल्या पार्टीला नागरिकांनी १ नंबरची पसंती देत १७ पैकी १६ जागेवर उमेदवारांना निवडून दिले.

नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि भिगवण गाव स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांनी एकत्र येत स्मशानभूमीत स्वच्छता करीत आपल्या कामकाजाला सुरुवात केली. यावेळी पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,पार्टी प्रमुख अशोक शिंदे , पराग जाधव ,तुषार क्षीरसागर ,सत्यवान भोसले,जयदीप जाधव ,दत्ता धवडे ,हरिश्चंद्र पांढरे ,तानाजी वायसे ,गुरापा पवार उपस्थित होते.

यावेळी पराग जाधव यांनी संपूर्ण स्मशानभूमीचा कायापालट करण्यात येणार असल्याचे सांगितले. शासकीय निधी आणि लोकवर्गणीतून वॉलकंपाउंड ,पेव्हर ब्लोक ,पाण्याची व्यवस्था आणि झाडांची लागवड केली जाणार असल्याचे सांगितले.

२५ भिगवण

Web Title: The new members started working from cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.