शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

येत्या तीन वर्षात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नवे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 20:50 IST

वाकडेवाडी, आंबिल ओढा, राजेंद्रनगर, घोरपडे पेठ येथील वसाहतींचा विचार केला जाणार

ठळक मुद्देधोकादायक इमारती : ७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार शासनाच्या निर्णयानुसार २८५ चौरस फुटांचे घर देण्याचा विचार सुरु प्रत्येक वसाहतीमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत इमारती बांधून स्थलांतर करण्यात येणार

पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमधील धोकादायक इमारतींच्या बीओटीद्वारे होणाऱ्या पुनर्विकासाला रहिवाशांसह स्थानिक नगरसेवकांनी कडाडून विरोध केल्यानंतर प्रशासनाने स्वत:च कर्मचाऱ्यांच्या इमारती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुनर्विकासाबाबत अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी अतिरीक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या पुनर्विकासासाठी ७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासनाने तयार केले असून वाकडेवाडी, आंबिल ओढा, राजेंद्रनगर, घोरपडे पेठ येथील वसाहतींचा विचार केला जाणार आहे.         समितीचे गठन झाल्यावर पुनर्विकासाबाबत तयार केलेला अहवाल आयुक्त आणि महापौरांना सादर करण्यात आला होता. आचारसंहिता लागल्याने याविषयावर पुढे फारशी कार्यवाही होऊ शकली नाही. यापुर्वी झालेल्या ‘बांधा वापरा हस्तांतरीत करा’ (बीओटी) करारनाम्यांच्या सद्यस्थितीचा अहवाल मागविण्यात आलेला होता. तसेच १७ जुलै रोजी या वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत महापौरांनी बैठक घेतली होती. या बैठकीला पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, पालिका कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार समितीची स्थापना करण्यात आली. पालिका कर्मचाऱ्यांनी बीओटी तत्वावर या इमारती विकसित न करता मालकी हक्काने द्याव्यात अथवा पालिकेने स्वत: विकसीत कराव्यात अशी आग्रही मागणी  केलेली होती. भवन व मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून यापुर्वी राबविल्या गेलेल्या निविदा प्रक्रियेची माहिती घेऊन या निविदांच्या सद्यस्थितीचा अभ्यास करुन तसेच वसाहतींच्या पुनर्निर्माणासाठी धोरण निश्चित करण्यात आले होते. वसाहती अन्य विकसकाला पुनर्निर्माणासाठी देण्यापेक्षा पालिकेनेच या वसाहती पुन्हा बांधल्या तर किती खर्च येऊ शकेल याचा अभ्यासपूर्ण अहवाल बांधकाम विभागाकडून सादर करण्यात आला होता. हा अहवाल अतिरीक्त आयुक्तांमार्फत आयुक्तांना सादर करण्यात आला. त्यानंतर महापौरांना हा अहवाल सादर करण्यात आला. परंतू, त्यावर आचारसंहितेपुर्वी कार्यवाही झाली नाही. विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने याविषयी आता धोरणात्मक निर्णय घेता आला नाही. प्रशासनाने पालिकेनेच कर्मचाऱ्यांच्या वसाहती नव्याने बांधाव्यात असा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करुन घेतली जाणार आहे. भवन विभागाने या प्रकल्पासाठी तुर्तास ७० कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ====  पालिकेने बीओटीची निविदा काढली तेव्हा कर्मचाऱ्यांना ४५० चौरस फुटांचे घर देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतू, आता पालिकाच पुनर्विकास करणार असल्याने शासनाच्या निर्णयानुसार २८५ चौरस फुटांचे घर देण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे कर्मचाºयांना नवे घर मिळणार असले तरी सदनिकेचा आकार मात्र कमी होणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार खोलीभाडे सुद्धा वाढणार आहे. या पुनर्विकासासाठी तीन वर्षांचा कालावधी गृहीत धरण्यात आला असून प्रत्येक वसाहतीमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत इमारती बांधून स्थलांतर करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारHomeघर