शिव महोत्सवामुळे नवीन पिढीला योग्य दिशा
By Admin | Updated: March 25, 2015 00:32 IST2015-03-25T00:32:44+5:302015-03-25T00:32:44+5:30
शिव महोत्सवामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहास नव्याने तरुणांसमोर येईल; नवीन पिढीला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

शिव महोत्सवामुळे नवीन पिढीला योग्य दिशा
बिबवेवाडी : शिव महोत्सवामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहास नव्याने तरुणांसमोर येईल; नवीन पिढीला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
राजमाता प्रतिष्ठान व एकरूप मित्र मंडळाच्या वतीने सहाव्या शिव महोत्सवात ते बोलत होते. या महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला.
शिवसेनेच्या विचारांना जनशक्तीने साथ दिल्यामुळेच राज्यात व दिल्लीत बदल घडवून शिवसेना सत्तेत आली, असे मत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की राजकीय फायद्यासाठी तरुणांना व्यसनाधीन करणे ही शिवसेनेची संकृती नाही. मागच्या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा पराभव करून जनशक्तीचा विजय झाला.
संदीप चव्हाण यांचे शिवाजीमहाराजांचा इतिहास सांगणारे व्याख्यान झाले. कार्यक्रमाला महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेविका कल्पना थोरवे, संभाजी थोरवे, निर्मला केंडे, अशोक हरणावळ, फुलचंद चाटे, शशिकांत कांबळे, बाळासाहेब धोका, अनंता चव्हाण, दादा कोंढरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाला सुरुवात
४चंदननगर : चंदननगर भाजी मार्केटमधील श्री शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व नूतनीकरण करण्याच्या कामांचे भूमिपूजन माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे व नगरसेविका संजिला पठारे यांच्या हस्ते करण्यात आले.
४या कामासाठी नगरसेवक महेंद्र पठारे व संजिला पठारे यांच्या विकास निधीतून तरतूद करण्यात आली आहे. वीस वर्षांपूर्वी हा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे सुशोभीकरण व नूतनीकरण करणे गरजेचे होते, अस मत पठारे यांनी व्यक्त केले. यशवंत चव्हाण, संतोष बोराटे, राहुल पठारे, बाळासाहेब चांधरे, मधुकर पठारे, विनोद पठारे, मनोज पाचपुते, किरण खैरे, सुधीर राहणे, गणेश थोरात, स्वप्निल कटके, सुहास तळेकर व गौरव राजगुरू या वेळी उपस्थित होते.
४धनकवडी : भारती विद्यापीठ परिसरातील कै. हनमंतराव थोरवे शाळेच्या प्रांगणात आयोजित शिव महोत्सव उत्साहात झाला. मान्यवरांनी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. या प्रसंगी ‘भगवा’ हे महानाट्य सादर करण्यात आले.
४नगरसेविका कल्पना थोरवे तसेच राजमाता प्रतिष्ठानचे अॅड. सभांजी थोरवे यांनी महोत्सव भरविला होता. अध्यक्षस्थानी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सत्यवान उभे, विनायक निम्हण, दत्तात्रय धनकवडे, डॉ. अमोल कोल्हे, निर्मला केंडे, सचिन तावरे, सुवर्णा पायगुडे, मोहिनी देवकर उपस्थित होत्या. डॉ.कोल्हे म्हणाले,‘‘आजच्या पिढीला हिंदू संस्कृतीचा इतिहास माहिती होणे आवश्यक आहे.’’