शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

महापालिकेकडून नवीन कोरोना नियमावली जाहीर; पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 19:14 IST

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी काढले आदेश....

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात नवे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढला आहे. यात सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, मागील 3 ते 4 दिवसांपासून शहरात तीन हजारांवर रुग्ण सापडत असल्याने पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय उद्या जाहीर होऊ शकतो. 

पुण्यातील कोरोनाचा वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महापौर मुरलीधर मोहोळ आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर पुणेकरांवर कडक बंधने आणण्यासंबंधीच्या प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती आहे.

महापौरांनी मागील आठवड्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नाही असे जाहीर केले होते. मात्र, कोरोना बाधितांची संख्या याच प्रमाणात वाढत राहिली तर पुणेकरांवर आणखी  कडक निर्बंध आणण्याविषयीचे संकेत दिले होते.

आजच्या आदेशात, पुणे शहरात सर्व  प्रकारच्या राजकीय,सांस्कृतिक,सामाजिक धार्मिक, कार्यक्रमांना बंदी असणार आहे. तसेच लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यविधीसाठी केवळ २० जणांनाच उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आलेली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढीत वेगाने वाढ होत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांकडून नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. मात्र याउलट बहुतांश ठिकाणी नियम सर्रास धाब्यावर बसवलेले पाहायला मिळत आहे.गेल्या महिन्याभरात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजारांवर पोहचली आहे.

नवीन आदेशात अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आली आहे. ====आयुक्तांच्या आदेशामध्ये सर्व प्रकारचे खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

परंतु, शासकीय , निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत प्रमुखांनी निर्णय घ्यावा.

शहरातील नाट्यगृहे 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा

. मात्र, याचवेळी कोविड बाबतच्या सर्व  आदेशांचे पालन होणे आवश्यक असणार आहे.

उत्पादन क्षेत्र पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येतील. पण त्या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल अशा प्रकारे उपस्थितीबाबत नियोजन करावे लागणार आहे.  

* नागरिक व कर्मचाऱ्यांना विनामास्क प्रवेश देता कामा नये. * प्रवेशद्वारावर थर्मामिटरद्वारे तपासणी करण्यात यावी. * सॅनिटायझर चा वापर उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.* कोरोना नियमावलीचे पालन होते की नाही यासाठी कर्मचारी नियुक्त करावे. * सदर नियमांचा भंग झाल्यास केंद्र शासन कोविड आपत्ती संपूर्णपणे संपली असे जाहीर करत नाही तोपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्यात  येतील. तसेच आस्थापना मालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. * संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, मार्गदर्शक सूचना, पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील. ..........

महत्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे: 1. प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील मॉल, थिएटर, रेस्टॉरंट, बार, फूट कोर्ट यांना रात्री 10 पर्यंतच मुभा2. घरपोच जेवणाची सुविधा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार3. प्रतिबंधात्मक सूचनांची माहिती दर्शनीय भागात लावणे बंधनकारक4  धार्मिक स्थळांमधील प्रवेशावर मर्यादा, आॅनलाइन पासची सुविधा5. लग्नसमारंभासाठी केवळ 50 जणांना उपस्थित राहता येईल.6. अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांना परवानगी====* शहरातील सर्व आस्थापनांमध्ये विनामास्क प्रवेश नाही.* प्रवेशद्वारावर थर्मामिटर, थर्मल गन, पल्स आॅक्सिमीटर ठेवण्यात यावा.* हॅन्ड सॅनिटायझर ठेवणे.* सुरक्षित अंतर राखले जाईल याकडे लक्ष देणे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त