टेम्पोच्या हौद्यात टाकले नवजात अर्भक
By Admin | Updated: October 13, 2016 02:48 IST2016-10-13T02:48:05+5:302016-10-13T02:48:05+5:30
कात्रज येथील गणेश चौकात उभ्या असलेल्या एका टेम्पोच्या हौद्यामध्ये पुरुष जातीचे नवजात अर्भक टाकून देण्यात आल्याची घटना उघडकीस

टेम्पोच्या हौद्यात टाकले नवजात अर्भक
पुणे : कात्रज येथील गणेश चौकात उभ्या असलेल्या एका टेम्पोच्या हौद्यामध्ये पुरुष जातीचे नवजात अर्भक टाकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेशनगर चौक ते साईसिद्धी चौकाच्यादरम्यान बालाजी जनरल स्टोअर्सपासून काही अंतरावर पांढऱ्या रंगाचा टेम्पो उभा होता. या टेम्पोच्या पाठीमागील हौद्यामध्ये पुरुष जातीचे अर्भक मंगळवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास आढळून आले होते. याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल लक्ष्मण तांबे यांनी फिर्याद दिली आहे.